मतदान व मतमोजणीसाठी प्रशासन यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 01:04 AM2020-01-06T01:04:38+5:302020-01-06T01:04:42+5:30

जिल्हा परिषदेच्या ५७ आणि आठ पंचायत समित्यांमधील ११२ जागांसाठी मंगळवारी ७ जानेवारी रोजी मतदान होणार

Equipped with administration system for voting and counting | मतदान व मतमोजणीसाठी प्रशासन यंत्रणा सज्ज

मतदान व मतमोजणीसाठी प्रशासन यंत्रणा सज्ज

Next

हितेन नाईक
पालघर : जिल्हा परिषदेच्या ५७ आणि आठ पंचायत समित्यांमधील ११२ जागांसाठी मंगळवारी ७ जानेवारी रोजी मतदान होणार असून मतदान व मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. राज्य निवडणूक आयोगाने ७ डिसेंबर २०१९ रोजी पालघर जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या आठ पंचायत समित्यांच्या निवडणुका कार्यक्रम जाहीर केलेला होता. त्यानुसार ७ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० दरम्यान जिल्ह्यातील एकूण १ हजार ३१२ मतदान केंद्रावर मतदान होणार असून बुधवारी ८ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या निवडणुकीच्या तयारीचा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी आढावा घेतला असून निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सर्व मतदारांची एकूण संख्या १० लाख ४४ हजार १८८ इतकी असून त्यात ५ लाख ३० हजार ६२१ पुरुष तर ५ लाख १४ हजार २२८ महिला आणि ३४ इतर अशी संख्या आहे. मतदानासाठी मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी व इतर कर्मचारी असे एकूण ७ हजार २२१ अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून २६ डिसेंबर २०१९ पासून निवडणूक परिषद प्रशिक्षणाच्या कार्यक्रम ही पार पडला आहे. मतदानासाठी एकूण २ हजार २८४ बॅलेट युनिट तर १ हजार ८५३ कंट्रोल युनिट उपलब्ध करून देण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकाºयांनी सांगितले.
या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या ईव्हीएम यंत्राचा वापर होणार असून त्यासोबत व्हीव्हीपॅट यंत्र नसेल. एसीआई एलकंपनीचे यंत्र असून ते अत्याधुनिक असल्याच्या दावा प्रशासनाने केला असून १ हजार ३१२ मतदान केंद्रात साठी १ हजार ८५० ईव्हीएम यंत्र वितरीत करण्यात येणार आहेत.
>६ आणि ७ जानेवारी रोजी शाळा व महाविद्यालयाला सुटी जाहीर : जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाºया आठ पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी दि. ६ जानेवारी तसेच मतदान
दि. ७ जानेवारी रोजी पालघर जिल्ह्यातील शाळा, विद्यालय तसेच महाविद्यालयाला सुटी जाहीर करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले.
>जिल्ह्यातील तालुकानिहाय मतमोजणी केंद्र
तलासरी तालुक्यातील मतमोजणी तलासरी तहसील कार्यालयात होणार असून डहाणू तालुक्यातील मतमोजणी सेंट मेरी हायस्कूल मसूरी येथे, विक्रमगड तालुक्यातील मतमोजणी विक्रमगड पंचायत समिती सभागृह जवळील आदिवासी भवन येथे, मोखाडा तालुक्यातील मतमोजणी क्रांतीवीर राघोजी भांगरे सभागृह पंचायत समिती मोखाडा येथे, वाडा तालुक्याची मतमोजणी पीजी हायस्कूल वाडा येथे, पालघर तालुक्याची मतमोजणी टीमा बोईसर हॉलमध्ये तर वसई तालुक्यातील मतमोजणी वसई तहसील कार्यालय सभागृहात होणार आहे.

Web Title: Equipped with administration system for voting and counting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.