इरले, घोंगडी ऐवजी रेनकोटला पसंती
By admin | Published: July 14, 2016 01:30 AM2016-07-14T01:30:45+5:302016-07-14T01:30:45+5:30
एकेकाळी पावसाळा सुरु होताच इरले, घोंगडी यांना मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून तसेच आदिवासींकडून मागणी होती. परंतु बदलत्या काळात ती नामशेष होत चालली असून
मोखाडा : एकेकाळी पावसाळा सुरु होताच इरले, घोंगडी यांना मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून तसेच आदिवासींकडून मागणी होती. परंतु बदलत्या काळात ती नामशेष होत चालली असून त्या जागी प्लॅस्टिकच्या रेनक ोटला शेतकऱ्यांकडून पसंती दिली जात आहे.
पावसाळयात जव्हार, मोखाडा, विक्रमगड या तालुक्या मधील ग्रामीण भागातील आदिवासी लोक पळसाची पाने, बांबू आणि अंबाडीचे सूत काढून इरले, घोंगडी बनविण्याचे काम करायचे व या मधून त्यांना चांगला रोजगारही उपलब्ध होत असे पंरतु काळाच्या ओघात आधुनिक साधनाचा वापर केला जात असल्याने जुनी गायब होताना दिसत आहेत.
शेतीतून बैल,नांगर याचा वापर कमी होऊन त्यांची जागा टॅ्रक्टरने घेतली तसेच इरले, घोंगडी ची जागा आता रेनकोट, प्लास्टिक, छत्र्या यांनी घेतल्यामुळे इरली, घोंगडी बनवण्यांच्या पारंपारिक व्यवसायिकांवर बेकारी ची कुऱ्हाड कोसळली आहे. पावसापासून बचाव करणारा रेनकोट ७०० ते ८०० रुपयांना मिळत असला तरी इरले १०० ते २०० रूपयांना तर घोंगडी २०० ते ३०० रु पयांपर्यंत मिळतात. मात्र, रेनकोटच्या वापरामुळे पावसापासून जास्त संरक्षण मिळत असल्याचे तरुण शेतकऱ्यांनी सांगितले. (वार्ताहर)