आलोंड्यातील एस्टीम कंपनी बंद, अनेक बेरोजगार

By admin | Published: September 25, 2016 04:00 AM2016-09-25T04:00:25+5:302016-09-25T04:00:25+5:30

विक्र मगड तालुक्यातील एकमेव अशा एस्टीम इंडस्ट्रीयल कंपनीला तिने सार्वजनिक ठिकाणी प्रदूषण निर्माण केल्यामुळे तिचे कामकाज बंद करण्याच आदेश वाडा उपविभागीय

Esteem company closed in Alandi, many unemployed | आलोंड्यातील एस्टीम कंपनी बंद, अनेक बेरोजगार

आलोंड्यातील एस्टीम कंपनी बंद, अनेक बेरोजगार

Next

- राहुल वाडेकर, विक्रमगड

विक्र मगड तालुक्यातील एकमेव अशा एस्टीम इंडस्ट्रीयल कंपनीला तिने सार्वजनिक ठिकाणी प्रदूषण निर्माण केल्यामुळे तिचे कामकाज बंद करण्याच आदेश वाडा उपविभागीय अधिकारी डॉ.मोहन नंदलकर यांनी दिला आहे. त्यामुळे अनेक बेरोजगार होणार आहेत.
कंपनीने सोडलेल्या केमिकलयुक्त पाण्यामुळे आलोंडे या गावातील शेकडो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. तसेच या केमिकलयुक्त पाण्यामुळे गावातून वाहणाऱ्या ओहळातील पाणी फेसाळ बनल्यामुळे मासे, खेकडे मोठ्या प्रमाणात मृत पावले होते. हे पाणी प्यायल्याने येथील एका शेतकऱ्याच्या दोन गाई मृत्युमुखी पडल्या आहेत. या केमिकल मिश्रीत पाण्यामुळे आलोंडे परिसरातील अनेक शेतक-यांच्या भातशेतीचेही प्रचंड नुकसान झाले आहे. आलोंडे गावालगत एका नाल्याशेजारी गेल्या दोन वर्षापासून ही केमिकल कंपनी सुरु आहे. तिचे दूषित पाणी शेजारच्याच नाल्यामध्ये सोडले आहे. सध्या हा नाला वहात असून या नाल्याशेजारील भातशेती करपू लागली आहे. अशी तक्रार उपसरपंच प्रमोद पाटील यांनी दोन महिन्यापूर्वीच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली आहे. परंतु त्यांनी आजवर दखल घेतली नव्हती असे सांगितले. दरम्यान वाड्याचे उपविभागीय महसुल अधिकारी डॉ. मोहन नलदकर यांनी या कंपनीला भेट देवून कंपनी तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
मात्र याशासकीय आदेशामुळे शेकडो स्थानिक तरुणांपुढे बेरोजगारीचे संकट उभे राहिले असून पुन्हा एकदा त्यांच्या उदरिनर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
कंपनीच्या व्यवस्थापनाकडे विचारणा केली असता हे कृत्य एखाद्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांने जाणून-बुजून केले असून याबबत आम्ही विक्र मगड पोलिस स्टे. येथे गुन्हा नोंदविला आहे. तसेच झालेल्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देण्यास कंपनी प्रशासन तयार आहे. मात्र पुढील शासकीय आदेश येईपर्यंत आम्ही कंपनीचे उत्पादन थांबवत आहोत, असे म्हटले आहे. मुळात कंपनीने वेळीच जागरुकता दाखवून संबंधितांना भरपाई दिली असती व प्रदूषण थांबविले असते तर ही कारवाई करावीच लागली नसती. आता गळ्यापर्यंत आल्यावर कंपनीला भरपाईची भाषा सुचते आहे, अशी टीका ग्रामस्थांनी लोकमतशी बोलताना केली.

ही कंपनी बंद झाल्यास येथील स्थानिक आदिवासी तसेच इतर समाज्याच्या तरु णांवर बेरोजगाराची कुऱ्हाड कोसळून अनेक संसार रस्त्यावर येतील.त्यासाठी कंपनी बंद करणे हा पर्याय नसून ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना तत्काळ नुकसान भरपाई देऊन ही कंपनी चालू ठेवावी. कंपनीने आपली सुरक्षा व्यवस्था वाढवून असे ेप्रकार पुढील काळात
घडणार नाही, याची काळजी घ्यावी.
- डॉ.सिद्धार्थ सांबरे, सामाजिक कार्यकर्ते.

मी विक्र मगड तालुक्यातील बोरसे पाडा येथील तरु ण असून आलोंडा येथील कंपनी चालू झाल्याने मला येथे रोजगार मिळाला.गेली चार वर्ष मी या कंपनीत काम करतो व माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. ही कंपनी प्रशासनाने बंद केल्यास मी माझ्या सारख्या अनेक आदिवासी तरु णांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. त्यामुळे आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येईल.
- बाळू सहारे, आदिवासी स्थानिक कामगार.

शासनाने तडकाफडकी निर्णय घेऊन आलोंडा येथील एस्टीम प्रा.ली. कंपनीला सील ठोकले आहे त्यामुळे आमच्यापुढे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.
त्यामुळे शासनाने योग्य तो निर्णय घेऊन ही कंपनी
त्वरित चालू करावी. नाही तर येथील बेरोजगार झलेल्या
तरु णांना पर्यायी नोकऱ्या द्याव्यात नाही तर या
कंपनीतील शेकडो बेरोजगार तरु णांना आंदोलन करावे लागेल.
- सतेज ठाकरे, स्थानिक कर्मचारी.

Web Title: Esteem company closed in Alandi, many unemployed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.