तक्रारीनंतरही कॅन्टीन सुरुच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 12:31 AM2018-05-01T00:31:24+5:302018-05-01T00:31:24+5:30
येथील रेल्वे प्लॅटफॉर्म नंबर १ वरील मिलन शहा यांच्या मालकीच्या कँटीनमध्ये ताक बनविलेल्या भांड्यात किडे असल्याच्या तक्र ारी नंतरही प्रवाशाच्या जीविताशी खेळणाऱ्या कँटीनवर तात्काळ कारवाई करणे अपेक्षित असताना
हितेन नाईक
पालघर : येथील रेल्वे प्लॅटफॉर्म नंबर १ वरील मिलन शहा यांच्या मालकीच्या कँटीनमध्ये ताक बनविलेल्या भांड्यात किडे असल्याच्या तक्र ारी नंतरही प्रवाशाच्या जीविताशी खेळणाऱ्या कँटीनवर तात्काळ कारवाई करणे अपेक्षित असताना तक्र ारी नंतर तीन दिवस उलटूनही कँटीन ठेकेदाराने सुरूच ठेवली आहे.
पालघर रेल्वे स्टेशनहुन दररोज ७० ते ८० हजार प्रवासी मुंबई, गुजरातच्या दिशेने प्रवास करीत असतात. स्टेशनच्या १ नंबर प्लॅटफॉर्म वरील मुख्य प्रवेश द्वाराला लागूनच चंदनलाल शहा नामक ठेकेदारांच्या नावाने पश्चिम रेल्वेकडून कँटीन चालविण्याचा ठेका घेण्यात आला असून पालघर मधील मिलन शहा नामक व्यक्ती हे कँटीन चालवीत आहे.
२८ एिप्रल रोजी प्रफुल गावड हे बोईसर येथून रात्रौ १ वाजता पालघर स्टेशनवर उतरल्यावर कॅँटीनमध्ये भांड्यावर किडे वळवळत असल्याचे पाहिल्यावर त्यांनी स्टेशन मास्तरांकडे लेखी तक्रार केली. मात्र दुसºया दिवशी या कॅँटीनवर कारवाई होण्या एवजी ते सुरुळीत सुरु असल्याचे निदर्शनास आले. त्यावर त्यांनी स्टेशनमास्तर क डे जाब विचारला असता वरुन कारवाई स्थगित करण्याची आॅर्डर असल्याचे सांगितले.
दुसºया दिवशीचा कॅँ टींन सुरु असल्याचा प्रकार स्टेशन मास्तरांची भेट घेऊन सांगितला असता दुपारी २ वाजून ०५ मिनिटांनी सदर कँटीन तात्काळ बंद करण्याच्या सूचना आल्याची माहिती तक्र ारदाराला दिली. मात्र, काही मिनिटातच पुन्हा कारवाई करू नका तूर्तास थांबा असा मेसेज आल्याने हे कँटीन पुन्हा सुरूच असल्याचे दिसले.
या बाबत पत्रकारांनी पश्चिम रेल्वेचे प्रवक्ते रवींद्र बाकर यांच्याशी संपर्क साधला असता कँटीन धारकाकडून पहिल्यांदा अपराध झाल्याने १० हजाराचा दंड ठोठावल्याची माहिती दिली. या बाबत तक्र ारदारांनी संशय व्यक्त केला असून अनेक कँटीन मध्ये नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे त्यांनी सागितले.
या संधर्भात ह्या कँटीन चे मालक मिलन शहा ह्यांच्याशी संपर्क साधला असता मी दवाखान्यात आहे.मी तुम्हाला थोड्या वेळेत फोन करतो असे सांगितले.मात्र त्यांनी फोन केला नाही.पालघर रेल्वेस्थानकातील ज्या स्टॉलवर शीतपेयाच्या भांड्यात अळ्या सापडल्या,त्या विक्र ेत्यावर आजतागायत कोणतीही कारवाई नाही. रेल्वेप्रशासन गप्प का? प्रवाश्यांच्या आरोग्यापेक्षा पासावर शिक्के मारून प्रवेश निषिद्ध करणे ही गोष्ट रेल्वेला जास्त महत्वाची वाटते का? - प्रथमेश प्रभुतेंडोलकर