गांजाचे सेवन करणा-या चार उच्चशिक्षित तरुणांना अटक तरीही गांजाविक्रेते मोकाटच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 02:02 AM2017-10-10T02:02:35+5:302017-10-10T02:03:28+5:30
पालघर-मनोर रस्त्यावरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पडक्या गाळ्यांमध्ये गांजाचे सेवन करणा-या चार उच्चशिक्षित तरुणांना अटक झाली असली तरी या गांज्याची विक्री करणारे मात्र मोकाटच आहेत.
पालघर/चहाडे : पालघर-मनोर रस्त्यावरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पडक्या गाळ्यांमध्ये गांजाचे सेवन करणा-या चार उच्चशिक्षित तरुणांना अटक झाली असली तरी या गांज्याची विक्री करणारे मात्र मोकाटच आहेत. त्यांना अटक व्हावी अशी मागणी होते आहे.
मनोर कडे जाणाºया रस्त्यावर असलेल्या सेंट जॉन इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील व बाहेरील विद्यार्थी येत असतात त्यांचे शैक्षणिक भविष्य उद्ध्वस्त करण्यासाठी, त्यांना मादक द्रव्याचे व्यसन लावले जाते. हे कॉलेज व सोनोपंत दांडेकर कॉलेज सातपाटी मधील निर्जन ठिकाणे अशा स्थानी मोठ्या प्रमाणात गांजा व अन्य मादक द्रव्याची विक्री केली जात असून तरुण मुले त्याच्या आहारी जात आहेत. पालघर मधील गांधी नगर हे फार वर्षांपासून अशा धंद्यांसाठी प्रसिद्ध असले तरी काही लोक बाहेरून येऊन या मादकद्रव्याची विक्री करीत असल्याची माहिती आहे.
रविवारी (८ आॅक्टोबर) रात्रौ ९.४५ वाजता बाजार समितीच्या पडक्या गाळ्यात अमली पदार्थांचे सेवन करणाºया चार तरुणांना पोलिसांनी अटक करून त्यांच्या विरोधात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही सर्व मुले उच्चशिक्षित असून त्यातील दोघे सेंट जॉन कॉलेजचे माजी विद्यार्थी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ह्यातील एक आरोपी हा एका कॉलेजातील प्रोफेसर चा मुलगा आहे. नुकतेच तलासरी येथे ४० कोटीच्या हेरॉईनचा साठा जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे तरु णाई व्यसनाधीन बनविण्याचे षडयंत्र हाणून पाडण्याचे काम पोलिसांना करावे लागणार आहे.