अखेर मशिदीच्या बोगस एन.ए. प्रकरणी ३ गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 10:51 PM2019-06-02T22:51:30+5:302019-06-02T22:51:46+5:30

दैनिक लोकमताचा पाठपुरावा : अखेर कारवाई झाली.

Eventually the mosque's bogus NA In case 3 offenses | अखेर मशिदीच्या बोगस एन.ए. प्रकरणी ३ गुन्हे

अखेर मशिदीच्या बोगस एन.ए. प्रकरणी ३ गुन्हे

Next

सुरेश काटे 

तलासरी : तालुक्यातील उधवा येथील मशिदीचे बांधकाम बोगस एन.ए. ऑर्डर बनवून करण्यात आले. याबाबत पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी मशिदीच्या बांधकामसाठी एन.ए.ची ऑर्डर दिली नसल्याचे काळविल्यानंतर तलासरी पोलिसांनी संबधीत तीन इसमावर गुन्हे दाखल केले आहेत. हा बोगस ऐन ऐ ऑर्डरचा मुद्दा दैनिक लोकमतने उचलून धरला होता.

गेले वर्षभर हा मशिदीच्या बांधकामाचा बोगस एन.ए. ऑर्डरचा मुद्दा तलासरी भागात गाजतो आहे. उधवा ग्रामपंचायतीला बोगस एन.ए. ऑर्डर दाखवून त्यांच्याकडून विविध परवानग्या घेण्यात आल्या. पण मशिदीच्या बांधकामवेळी वाद झाल्याने ही बोगस एन.ए. उघडकीस आली. यावेळी तलासरी पोलीस स्टेशनला तलासरीत नागरिक बजरंग शाह यांनी तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल झाला तरी अटक होऊ नये यासाठी बोगस एन.ए. ऑर्डर बनविणाऱ्यांनी तपासी अधिकाºयाला पंधरा लाखाची लाच देण्याचे अमिष दाखवून तशी फिर्याद भ्रष्टाचार लाचलुचपत विभागाकडे दाखल करून त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरोटे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उधवा मशिदीची एन.ए. ऑर्डर दिली नसल्याचे कळविल्यानंतर तलासरी पोलिसांनी ग्रामपंचायत उधवा यांना सक्षम अधिकाºयांनी येऊन पोलिसात फिर्याद दाखल करावी, असे पत्र दिले.

तलासरी पोलिसांनी उधवा ग्रामपंचायतीला पत्र दिल्यावर ग्रामपंचायतीचे ग्रामविस्तार अधिकारी गणपत गवळी यांनी फिर्याद दाखल करणे गरजेचे होते. पण गवळी पत्र मिळूनही तक्रार दाखल करण्यासाठी चालढकल करीत होते. एवढेच काय बोगस एन.ए. ऑर्डर सिद्ध होऊनही ग्रामपंचायतीने मशिदीला दिलेल्या परवानग्या रद्द केला नाहीत, ग्रामविस्तर अधिकाºयांचा चालढकलपणा तलासरीचे गटविकास अधिकारी राहुल म्हात्रे यांच्या निदर्शनात आणून देऊनही त्यांनीही या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केल्याने, बोगस एन.ए. ऑर्डरबाबत ग्रामविस्तार अधिकारी गणपत गवळी यांची भूमिका संशयास्पद दिसून आली. दुर्दवाची बाब म्हणजे ज्या पालघर जिल्हाधिकाºयांची सही व शिक्का वापरून बोगस एन.ए. ऑर्डर बनविली ते जिल्हाधिकारी कार्यालय सुस्त दिसून आले. तसेच पालघर जिल्हाधिकारी नारनवरे यांनीही याची गंभीर दखल घेतली नसल्याने बनावट कागदपत्रे बनविणाऱ्या टोळ्या मोकाट राहिल्या होत्या. ग्रामविस्तार अधिकारी तक्रार दाखल करीत नाहीत, गटविकास अधिकारी व पालघर जिल्हाधिकारी कार्यालय सुस्त असल्याने याची दखल तलासरी पोलिसांनी घेऊन पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय वसावे यांनी प्रथम तक्रारदार बजरंग शाह यांची तक्रार घेऊन उधवा मशीद बोगस एन.ए. प्रकरणी इंद्रिस सफिक खान, इस्माईल खाटीक, अल्लाउद्दीन पटेल, हे राहणार उधवा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.

 

Web Title: Eventually the mosque's bogus NA In case 3 offenses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :palgharपालघर