पालघर जिल्ह्यामध्ये सर्वत्र नवरात्र उत्सवाची धूम
By admin | Published: October 6, 2016 02:31 AM2016-10-06T02:31:26+5:302016-10-06T02:31:26+5:30
नवरात्रोत्सवाची धूम पालघर जिल्ह्यात जोरदार सुरु असून पावसाच्या धुमाकुळा नंतरही गरंब्यांचा उत्साह कमी झालेला नाही.
पालघर : नवरात्रोत्सवाची धूम पालघर जिल्ह्यात जोरदार सुरु असून पावसाच्या धुमाकुळा नंतरही गरंब्यांचा उत्साह कमी झालेला नाही. जिल्ह्यातील आठ तालुक्यातील ८२० खाजगी आणि सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळात हा उत्सव सुरु असून हा सण निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षिका सह १ हजार ३४१ अधिकारी कर्मचारी व शिघ्रकृती दल, दंगल नियंत्रक पथके तैनात करण्यात आली आहेत.
नवरात्र दिन घटस्थापनेच्या पहिल्या दिवसा पासून पावसाने जोर धरला असला तरी लोकांच्या उत्साहात कुठे कमतरता आली असल्याचे दिसून आलेले नाही. गावा गावात बेंजो, डिजे, लाऊडस्पीकरच्या गजरात गरब्याचे ठेके धरले जात असून तरु णाई मोठ्या उत्साहाने सहभागी होताना दिसत आहे. न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे पोलीस खात्याने रात्री १० किवा १२ वाजेपर्यंतच वाजंत्रीला परवानगी दिल्याने थोडीशी नाराजी आहे. नवरात्रौ सणाची सर्वत्र सुरु असलेली धूम आण िपाकिस्तान च्या भागात जाऊन भारतीय जवानांनी केलेले सिर्जकल स्ट्राईक च्या कारवाई मुळे पाकिस्तानी दहशतवादी चवताळले असून त्यांनी भारतात दहशतवादी हल्ल्याचा इशारा दिला आहे.त्यामुळे ह्या सणावर दहशतवादाचे सावट राहिल्याने जिल्हा पोलीस प्रशासन सावध झाले आहे.पालघर च्या पोलीस अधिक्षिका शारदा राऊत ह्यांच्या मार्गदर्शना खाली २ अप्पर पोलीस अधीक्षक, ५ उपविभागीय पोलीस अधिकारी,१३६ पोलीस अधिकारी, ९५० पोलीस कर्मचारी, २५० होमगार्ड,राज्य राखीव पोलीस बलाची एक कंपनी,एक प्लाटून, शिघ्रकृती दलाचे एक प्लाटून, दंगल नियंत्रण पथकाचे दोन प्लाटून अशी पोलीस यंत्रणा ठेवण्यात आली आहे. (प्रतिनिधी)