अर्नाळ्यात घाणीचे साम्राज्य

By admin | Published: July 25, 2016 02:47 AM2016-07-25T02:47:46+5:302016-07-25T02:47:46+5:30

अर्नाळा समद्रकिनारी कचऱ्यांचे साम्राज्य पसरले असून, किनाऱ्यावर जाणाऱ्या रस्त्यावरच असलेल्या डंम्पिंग ग्राऊंडवर प्रचंड प्रमाणावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले

Evil Empire in Arnah | अर्नाळ्यात घाणीचे साम्राज्य

अर्नाळ्यात घाणीचे साम्राज्य

Next

शशी करपे,  वसई
अर्नाळा समद्रकिनारी कचऱ्यांचे साम्राज्य पसरले असून, किनाऱ्यावर जाणाऱ्या रस्त्यावरच असलेल्या डंम्पिंग ग्राऊंडवर प्रचंड प्रमाणावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून आधी येथे स्वच्छता करा व मगच पर्यटकांकडून कर वसूल करा अशी भूमिका पर्यटक व स्थानिकांनी घेतली आहे.
अर्नाळा समुद्र किनारा,या किनाऱ्यावर असलेली सुरुची बाग,चारही बाजूंनी पाण्याने वेढलेला ऐतिहासिक अर्नाळा किल्ला पाहण्यासाठी हजारो पर्यटक दररोज अर्नाळ्याला येत असतात. मात्र,निसर्गरम्य किनारा,शीतल वारा देणारी सुरुची बाग पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांवर किनाऱ्यावरील अस्वच्छता,कुजलेला कचरा यामुळे नाकाला रुमाल लावण्याची पाळी येत आहे.ज्या समुद्रात महात्मा गांधी आणि हिंदु हृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या अस्थी विसर्जीत केल्या गेल्या.त्या किनारी गावातील सर्व कचरा आणून टाकला जातो. त्यामुळे सर्वत्र घाणीचे सम्राज्य पसरले आहे. समुद्राला लागून असलेल्या स्मशानाच्या समोरच गावचे डंम्पिंग ग्राऊंड आहे. त्याठिकाणी आता कचराचे ढिग जमा झाले आहेत. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामपंचातीकडे दुसरी व्यवस्था नसल्याने कुजलेल्या कचऱ्याने किनाऱ्याची पुरती वाट लावली आहे. दुसरीकडे, किनाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यालगत शाळेसमोर असलेल्या कचरा कुंडीची नियमित सफाई होत नसल्याने याठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. त्यातच गटाराच्या अर्धवट कामामुळे भाजी मार्केटमध्ये दुर्गंधी पसरली आहे. अनेक पर्यटक याठिकाणी आल्यानंतर गावठी भाजी घेण्यासाठी गर्दी करतात. मात्र, उघड्या गटारामुळे भाजी विक्रेत्यांच्या धंद्यावर परिणाम होऊ लागला आहे.
अर्नाळा ग्रामपंचायत पर्यटकांकडून दुचाकी वाहनांसाठी १० रुपये,चारचाकीसाठी २० आणि बसेससाठी ४० रुपये अशी कर वसुली करते. त्यामुळे दररोज हजारो रुपयांचे उत्पन्न या कर रुपाना ग्रामपंचातीला प्राप्त होत आहे. काशी इतकेच महत्व असलेल्या या किनाऱ्यावर अनेक लोक धार्मीक विधीसाठी येत आहेत.त्यांना कचऱ्यांच दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे आधी किनारे स्वच्छ करा मगच कर घ्या अशी भूमिका जनआंदोलन समितीचे कार्यकर्ते निनाद पाटील,देवेंद्र वैती,राहुल तांडेल, दिगंबर मेहेर,रुकेश तांडेल, विश्वास किणी,शैलेश म्हात्रे,पराग म्हात्रे यांनी घेतली आहे.
डंम्पिंग ग्राऊंड परिसरात अनेक धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळे आहेत. तसेच सध्याच्या डंम्पिंग ग्राऊंडजवळून दररोज हजारो पर्यटकांना ये-जा करावी लागते. गावात इतर ठिकाणी केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक जागा आहेत. त्याठिकाणी डंम्पिंग ग्राऊंड बनवून सर्वांची घाणीच्या साम्राजतून मुक्तता केली पाहिजे. पर्यटकांकडून दररोज हजारो रुपयांचा कर वसूल केला जातो. तो पैसा गावातील स्वच्छतेसाठी वापरण्यात यावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

Web Title: Evil Empire in Arnah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.