पालघरात ईव्हीएम, व्हीव्हीपॅटची प्रात्यक्षिके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 12:28 AM2018-12-31T00:28:29+5:302018-12-31T00:28:42+5:30
लोकसभेच्या २०१९ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूकीत वापरल्या जाणाºया ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट या यंत्रांचे प्रात्यक्षिक सातपाटीच्या मच्छीमार्केट मध्ये जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे ह्यांच्या उपस्थितीत पार पडले.
पालघर : लोकसभेच्या २०१९ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूकीत वापरल्या जाणाºया ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट या यंत्रांचे प्रात्यक्षिक सातपाटीच्या मच्छीमार्केट मध्ये जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे ह्यांच्या उपस्थितीत पार पडले. महिलांनी त्यात सहभाग घेतला.
आगामी निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) सोबत व्होटर व्हेरिफिएबल पेपर आॅडिट ट्रेल (व्हिव्हीपॅट) यंत्राचा वापर प्रथमच करण्यात येणार आहे. या व्हिव्हीपॅटमुळे मतदारांना त्यांनी कोणत्या उमेदवाराला मत दिले याबाबतची खात्री करून घेता येणार आहे. ईव्हीएम व व्हीव्हीपॅट बाबत पालघर जिल्ह्यातील सर्व मतदारांना माहिती होण्यासाठी या यंत्राची प्रात्यक्षिके दाखविण्याचा कार्यक्रम २७ डिसेंबर पासून जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये आयोजिण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या उपस्थितीमध्ये सातपाटी मच्छीमार्केट येथे करण्यात आला. यावेळी उपजिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी, पालघर डॉ. किरण महाजन, मतदार नोंदणी अधिकारी, पालघर विधानसभा मतदार संघ विनोद खिरोळकर, व तहसिलदार पालघर महेश सागर हे उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्व मतदारांना ह्या यंत्रा बाबत माहिती देण्यात आली व त्यामध्ये मतदारांनी त्यांची मते नोंदविली. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व मतदारांनी या बाबतची माहिती प्राप्त करु न घ्यावी, असे आवाहन डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.