वाडा तालुक्यात माफियांची बेसुमार वृक्षतोड, माती उत्खनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 11:11 PM2019-06-06T23:11:09+5:302019-06-06T23:11:17+5:30

चौकशीची नागरिकांची मागणी : महसूल आणि वन विभाग झाला धृतराष्ट्र

Excavation of mafia in Wada taluka, soil exploration | वाडा तालुक्यात माफियांची बेसुमार वृक्षतोड, माती उत्खनन

वाडा तालुक्यात माफियांची बेसुमार वृक्षतोड, माती उत्खनन

Next

वाडा : तालुक्यातील खुपरी वनक्षेत्र पालांच्या कार्यक्षेत्रात येणा-या गावातील गट नंबर १५१ मधील क्षेत्रात हजारो ब्रास मातीचे उत्खनन बेकायदा झाले आहे. तर याच कार्यक्षेत्रातील जाळे येथील १५ एकर जागेतून बेकायदा वृक्षतोड झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणाने वनमाफियांचे धाबे दणाणले आहे. या उत्खनन व वृक्षतोडीची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. तालुक्यातील खुपरी या गावाच्या हद्दीतील गट नंबर १५१ ही जमीन वनविभागाच्या मालकीची आहे. या जमिनीवरील टेकडीचे सपाटीकरण करून हजारो ब्रास मातीचे उत्खनन विनापरवाना केले गेले आहे. विशेष म्हणजे या जागेपासून हाकेच्या अंतरावर वनपालांचे कार्यालय असतानाही माती चोरीला गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच जाळे या गावातील गट नंबर ५८/१ अ या जागेतील १५ एकर मध्ये साग, खैर, इंजाली व ऐन अशा मौल्यवान झाडांची बेसुमार वृक्षतोड दुसरे मालकी प्रकरण दाखवून केली आहे. विशेष म्हणजे एवढी प्रचंड वृक्षतोड व हजारो ब्रास मातीचे उत्खनन होतांना येथील कर्मचारी काय करत होते असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. त्यांच्या आशिवार्दाने हे झाले असल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात वाडा पश्चिम वनविभागाचे वनक्षेत्रपाल नितीन काळण यांच्याशी संपर्क साधला असता थोड्या वेळाने माहिती देतो असे ते म्हणाले.

मातीने भरलेले डंपर ताब्यात घेतले असून एका मजुरावर यासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची अधिक चौकशी सुरू आहे. तसेच वृक्षतोडी संदर्भात विचारले असता वरिष्ठ अधिका-यांकडून आपल्याला माहिती मिळेल असे सांगून त्यांनी अधिक बोलणे टाळले.
- सी. टी. बागकर, वनपाल खुपरी क्षेत्र

Web Title: Excavation of mafia in Wada taluka, soil exploration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.