‘आम्ही जसे घडलो, तसे तुम्हीही घडा’ माजी विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 11:37 PM2018-01-15T23:37:49+5:302018-01-15T23:37:58+5:30
शाळेच्या माजी विद्यार्थ्याचा एक ग्रुप २७ वर्षे उलटून गेल्यावरही गुरु - शिष्य परंपरा जोपासत आपल्याला घडविणा-या शिक्षकांना निमंत्रीत करून ऋणानुबंध सोहळा
वाडा : शाळेच्या माजी विद्यार्थ्याचा एक ग्रुप २७ वर्षे उलटून गेल्यावरही गुरु - शिष्य परंपरा जोपासत आपल्याला घडविणा-या शिक्षकांना निमंत्रीत करून ऋणानुबंध सोहळा आयोजित करतात आणि शाळेतील मुलांना संगणक भेट देऊन ‘आम्ही इथे जसे घडलो, तसे तुम्हीही घडा’ हा प्रेरणादायी संदेश देऊन चांगला आदर्श निर्माण करतात. हे कौतुकास्पद असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत भोईर यांनी दिली.
तालुक्यातील कुडूस विभाग शिक्षण सेवा संघ या संस्थेच्या ह. वि. पाटील विद्यालयाच्या १९९०-९१ च्या माजी विद्यार्थ्यांच्या बॅचचा ‘बंध मैत्रीचे’ नावाचा मित्र-मैत्रीणींचा एक ग्रुप विविध क्षेत्रात चांगला नावलौकिक मिळवून आहेत. यावर्षी त्यांनी शाळेतील मुलांसाठी चार संगणक भेट देण्याच्या निमित्ताने कृतज्ञता सोहळा आयोजित केला होता. यावेळी संस्थाध्यक्ष श्रीकांत भोईर यांनी मनोगत व्यक्त केले. माजी विद्यार्थापैकी सुजाता साळुंखे, रत्नप्रभा चौधरी, डॉ. पुनम बागुल, जगदीश भोईर, सुधीर कडव यांनी आठवणींना उजाळा दिला. शिक्षकांकडून मिळालेले शिस्तीचे, संस्काराचे धडे घेऊन आम्ही कसे घडलो हे त्यांनी सांगितले. तर त्यांचे शिक्षक आणि सध्या पालघर जिल्हा प्राथमिक शिक्षण विभागाच ेउपशिक्षणाधिकारी असलेले जे. के. पाटील, बी. एस. भोईर यांनी शालेय जीवनातील शिस्त जिद्द आणि संघर्षाचे महत्व विषद केले. कार्यक्र मास माजी शिक्षक पी. एन. पाटील, सावंत सर, पाचपांडे, व्ही. पी. भोईर, व्ही. सी. भोईर , चौधरी सर या सर्व निमंत्रितांना भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. माजी विद्यार्थाचे पालक परशुराम भोईर व सिताराम भोईर यावेळी उपस्थीत होते. कार्यक्र माचे प्रास्ताविक पोटकुले सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुधीर कडव, अनंता दुबेले,संदीप पाटील, सतिश मराडे, समीर शेख आदींनी परिश्रम घेतले.