परिवहनच्या कामगारांनाही हवे सानुग्रह अनुदान

By Admin | Published: October 28, 2015 12:37 AM2015-10-28T00:37:40+5:302015-10-28T00:37:40+5:30

वसई-विरार महानगरपालिकेच्या परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त बोनस अद्याप जाहीर झालेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे

Expedition grant to workers of transport | परिवहनच्या कामगारांनाही हवे सानुग्रह अनुदान

परिवहनच्या कामगारांनाही हवे सानुग्रह अनुदान

googlenewsNext

वसई : वसई-विरार महानगरपालिकेच्या परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त बोनस अद्याप जाहीर झालेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या प्रश्नी प्रशासन आणि संबंधीत ठेकेदार हे काय निर्णय घेतात याकडे सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. आयुक्त सतिश लोखंडे यांनी याप्रकरणी लक्ष घालुन कामगारांना न्याय द्यावा असे कामगारांचे म्हणणे आहे.
मनपाने परिवहन सेवा सुरू करून ३ वर्षे झाली. या काळात सेवेला वसईकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ज्या मार्गावर परिवहन सेवा सुरू झाल्या त्या फायद्यात असल्यामुळे बसेसमध्ये सातत्याने वाढ होत गेली. पण, दुसरीकडे यामुळे एस.टी महामंडळाची सेवा डबघाईला आली.
यंदा परिवहनच्या ठेकेदाराकडून चांगला बोनस मिळेल, अशी अपेक्षा असली तरी अद्याप चर्चा, बैठका सुरू न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. तर सरकारी नियमानुसार बोनस न मिळाल्यास कर्मचारी आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Expedition grant to workers of transport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.