रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी १ कोटी ७६ लाखांचा झाला खर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 11:55 PM2019-12-13T23:55:04+5:302019-12-13T23:55:37+5:30
वाणगाव-आसनगाव-चंडीगाव या १२ कि.मी.च्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी १० लाखांचा खर्च करण्यात आला.
- शौकत शेख
डहाणू : सार्वजनिक बांधकाम उपविभागाअंतर्गत येणाऱ्या प्रमुख राज्य मार्ग, राज्य मार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गावर या वर्षी सतत पडलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र खड्डे पडले होते. हे खड्डे डांबराने बुजवणे, साईड पट्टी, रस्त्यालगतची झाडेझुडपे साफसफाई करणे, चुना आणि गेरू लावणे या कामासाठी १ कोटी ७६ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
डहाणू-बोर्डी या २० कि.मी. रस्त्यावर १५ लाख, घोलवड-कोसबाड-कंक्राडी तसेच नरपड-वाकी या १७ कि.मी.रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी ११ लाखाची निविदा काढण्यात आली. जव्हार-मोखाडा-त्रंबक या ३२ कि.मी.च्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी आणि साईड पट्टी तयार करण्यासाठी ८० लाखांचा खर्च करण्यात आला आहे. डहाणू-चिंचणी या १६ कि.मी.च्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी ३७ लाखांचा खर्च करण्यात आला.
वाणगाव-आसनगाव-चंडीगाव या १२ कि.मी.च्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी १० लाखांचा खर्च करण्यात आला. तसेच कासा-सायवन या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी २३ लाख खर्च करण्यात आला आहे. दरम्यान, रस्त्याच्या कामाचे टेंडर मिळवण्यासाठी ठेकेदारांत मोठी स्पर्धा असते.मात्र ठेकेदारांना आवश्यक दरापेक्षा २० ते ३० टक्के कमी दराने निविदा भरावी लागत असल्याने कामाचा दर्जा कसा राखला जाईल? असा प्रश्न उपस्थित होत आहे.