वसई-विरार परिवहनकडून प्रवाशांना भरघोस सवलती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 04:44 AM2019-01-09T04:44:35+5:302019-01-09T04:44:45+5:30
वसई विरार मसानगरपालिकेच्या परिवहन सावेचा अधिकाअधिक प्रवाशांनी लाभ घ्यावा यासाठी परिवहन विभागाने प्रवाशांसाठी सवलतींची योजना जाहीर केली आहे.
वसई : वसई विरार महानगरपालिकेच्या परिवहन सेवेद्वारे नागरिकांना नवीन वर्षात विविध योजना राबविण्यास सुरूवात झाली आहे. प्रवासी वाढवण्यासाठी परिवहन सेवेच्या योजनेवर दोन महिन्यांच्या पासवर एक महिन्याचा पास मोफत, तर चार मिहन्यांच्या पानावर सहा महिन्याचा पास मोफत देण्यात येणार आहे.
वसई विरार मसानगरपालिकेच्या परिवहन सावेचा अधिकाअधिक प्रवाशांनी लाभ घ्यावा यासाठी परिवहन विभागाने प्रवाशांसाठी सवलतींची योजना जाहीर केली आहे. ‘दोन महिन्यांच्या पासावर एक महिना मोफत’ तर ‘चार महिन्यांच्या पासावर दोन महिने मोफत प्रवास’ अशा सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. या शिवाय स्मार्डकार्डच्या दरातही कपात करण्यात आली आहे. घटलेले प्रवासी वाढवणे, परिवहन सेवेकडे अधिकाअधिक प्रवाशांना आकर्षित करणे यासाठी नववर्षांची भेट म्हणून ही सवलत देण्यात आली आहे.
आॅक्टोबर २०१२ मध्ये ही परिवहन सेवा मे. भगीरथी ट्रान्सपोर्टतर्फे सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांच्या तक्रारी व भाडेवाढीमुळे प्रवासी संतप्त होते त्यामुळे परिवहन विभागाने प्रवाशांना नव्या वर्षी सवलतीच्या दरात प्रवास योजना जाहीर केली आहे. याशिवाय या सवलतीच्या योजनेत बस पासमध्ये आणि स्मार्ट कार्डमध्ये विशेष सवलत देण्यात आली आहे. १ जानेवारी ते ३१ जानेवारी २०१९ पर्यंत या योजनेचा लाभ प्रवाशांना घेता येणार आहे. शाळकरी विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी यापूर्वीच सवलती देण्यात आल्या आहेत. पालिकेच्या परिवहन सेवेच्या ताफ्यात आता एकूण १६० बस झाल्या आहेत. सर्व जुन्या बस काढून टाकण्यात येत आहेत. सवलतींमुळे त्यात वाढ होईल, असा विश्वास परिवहनने व्यक्त केला.
वायफाय सुविधा
प्रवाशांच्या सोयीसाठी परिवहन विभागाने बसमध्ये वायफाय सुविधा दिलेली आहे, तसेच प्रवाशांसाठी ८६९१०६२८२८ या क्रमांकावर व्हॉट्सअप हेल्पलाइन सेवा सुरू केली आहे. यामुळे परिवहन सेवेबद्दल असेलेल्या तक्रारी व सूचना या हेल्पलाइनच्या माध्यमातून मांडता येणार आहेत.
प्रवाशांसाठी परिवहन सेवा हा अत्यंत चांगला व सुरक्षित पर्याय आहे. जास्तीत जास्त प्रवाशांनी पालिकेच्या परिवहन सेवेच्या बसमधून प्रवास करावा यासाठी सवलतींच्या योजना कार्यान्वित केली आहे.
-प्रितेश पाटील, परिवहन सभापती
नागरिकांना या योजनेचा जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी या योजना राबवण्यात आल्या आहेत. सुलभ आणि सुखरूप प्रवासावर आहे.
-तुकाराम शिवभक्त, आगार व्यवस्थापक