बेशिस्त वाहनाचालकांवर कारवाई, ८ महिन्यांत ९ हजार केसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 11:50 PM2019-09-15T23:50:55+5:302019-09-15T23:50:58+5:30

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर चिंचोटी महामार्ग पोलिसांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या टीमने ८ महिन्यांत ९ हजार ६ केसेस करून २२ लाख ४९ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केला.

Extreme vehicle cases, 3 thousand cases in 6 months | बेशिस्त वाहनाचालकांवर कारवाई, ८ महिन्यांत ९ हजार केसेस

बेशिस्त वाहनाचालकांवर कारवाई, ८ महिन्यांत ९ हजार केसेस

Next

नालासोपारा : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर चिंचोटी महामार्ग पोलिसांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या टीमने ८ महिन्यांत ९ हजार ६ केसेस करून २२ लाख ४९ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. इतकी मोठी कारवाई झाल्याने बेशिस्त, भरधाव व बेदरकारपणे वाहने चालवणा-या चालकांमध्ये खळबळ माजली आहे.

जानेवारी २०१९ ते ३० ऑगस्ट २०१९ या ८ महिन्यांच्या कालावधीत सहायक पोलिस निरीक्षक जगदीश परदेशी, पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र वडे व नंदिकशोर चौगुले यांच्यासह २६ जणांच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. चिंचोटी ब्रिज, वासमारे ब्रिज याठिकाणी लेन किटंग व लेनची शिस्त न पाळणाºया तसेच बेशिस्त वाहनचालकांवर चिंचोटी महामार्ग पोलिसांनी कारवाई
केली आहे.
जड अवजड वाहनचालकांकडून ड्रायिव्हंग लायसन्स, वाहनाचा परवाना परिमट रद्द करण्याबाबतही प्रस्ताव तयार करून पाठविण्यात येणार असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. २३ मे पासून ई चालान डिव्हाईस मार्फत मोटार वाहन कायदा अनव्ये कसुरदार वाहन चालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात
आली आहे.
>अ. क्र . मो. वा. का. प्रमाणे कारवाई केसेस तडजोड रक्कम
१ लेन किटंग ३८८९ ७७७८००/-
२ विना हेल्मेट १४३१ ७१५५००/-
३ विना सीटबेल्ट २९९० ५९८२००/-
४ मोबाईल संभाषण ५५१ ११०२००/-
५ विरु द्ध दिशेने वाहन चालवणे १२१ २४२००/-
६ बेदरकारपणे/भरधाव वाहन चालवणे २४ २४०००/-
९००६ २२,४९,९००/-
>यापुढेही कसूर करणाºया वाहन चालकांविरु द्ध मोठ्या प्रमाणात ई चालान कारवाई करण्याची तीव्र मोहीम हाती घेण्यात आली आहे.
- जगदीश परदेशी
सहायक पोलिस निरीक्षक,
महामार्ग पोलीस, चिंचोटी

Web Title: Extreme vehicle cases, 3 thousand cases in 6 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.