भरसटमेट गावात भीषण पाणी टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 10:42 PM2019-06-04T22:42:32+5:302019-06-04T22:42:55+5:30
पाण्याची गरज भागवण्यासाठी लोक विहिरीवर नंबर लावून पाणी भरण्याची वेळ आली आहे
जव्हार : जव्हार तालुक्यापासून अगदी ३ किमी अंतरावर असलेल्या भरसटमेट गावाला अखेर मे जून मिहन्यात भीषण पाणी टंचाईला सुरवात झाली आहे. या गावात एकूण १२० कुटुंब संख्या असून गावची एकूण १ हजाराच्या आसपास लोकसंख्या या गावात एकूण ५ विहीरी असून चार विहीरी कोरड्या पडल्या आहेत.
तर एक विहिरीत थोड थोड पाणी आहे. पाण्याची गरज भागवण्यासाठी लोक विहिरीवर नंबर लावून पाणी भरण्याची वेळ आली आहे. विहीरीतील पाण्यात एवढा गाळ असूनही पाणी पिण्याची वेळ आहे. तसेच पाणी असलेल्या विहिरीवर जंगलातून जावून पाणी डोक्यावर व खांद्यावर घेवून यावे लागत आहे. याबाबत गावकऱ्यांनी पंचायत समिती पाणी पुरवठा विभागाकडे तक्रार केली असून यावर अजून कोणतीही सुविधा केलेली नाही. तसेच ग्रामपंचायत अंतर्गत पेसा निधीतून टँकर सुध्दा पुरवले जात नाही असे मत गावकऱ्यांनी मांडले आहे .