वसई श्वान निर्बीजीकरण केंद्राची अत्यंत दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 05:26 AM2018-11-12T05:26:33+5:302018-11-12T05:27:01+5:30

श्वानांचे मृतदेह कचऱ्यात फेकले : केंद्रचालकाची अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्डाच्यासदस्यांना दमदाटी

Extremely bad luck of Vasai Schwan Disinfection Center | वसई श्वान निर्बीजीकरण केंद्राची अत्यंत दुर्दशा

वसई श्वान निर्बीजीकरण केंद्राची अत्यंत दुर्दशा

Next

वसई : वसई महानगरपालिकेचे श्वानांचे ए.बी.सी.नसबंदी सेंटर हे मुलुंड येथील उत्कर्ष स्टार मित्र मंडळाकडून चालविले जाते. त्याचे सेक्रेटरी अ‍ॅड. दगडू लोंढे हे आहेत. ते वसई पूर्वमधील स्मशानभूमीजवळील एका शेडमध्ये असलेल्या या केंद्राची अत्यंत दुर्दशा झाली आहे.

तेथे १२१ पिंजरे आहेत. दररोज या ठिकाणी साधारण १५ श्वानांची नसबंदी करण्यात येते. मात्र दिवाळीच्या कालावधीत या श्वानांची देखभाल करणारे कर्मचारी केंद्राला लॉक लावून रजेवर गेले होते. त्यामुळे गेल्या पाच दिवसात या श्वानांना अन्न पाणी न मिळाल्यामुळे त्यातील दोघांचा मृत्यू शनिवारी झाला होता. तर ३ श्वानांचा मृत्यू तत्पूर्वी झाला होता. यावेळी या केंद्रात ५० पेक्षा जास्त श्वान भुकेमूळे कासाविस झालेले होते. याबाबत अ‍ॅनीमल वेल्फेअर बोर्ड आॅफ इंडियाचे सदस्य मितेश जैन यांना माहिती मिळताच त्यांनी सहका-यांमार्फत या केंद्रात धाव घेऊन वस्तुस्थिती पाहिली. यावेळी श्वानांची दयनीय अवस्था पाहून अंगावर अक्षरश: शहारे आल्याचे त्यांनी सांगितले. इतक्या वाईट परिस्थीतीत या श्वानांना ठेवण्यात आले होते.नसबंदी केल्यानंतर त्यांची स्वच्छता करण्यात आलेली नव्हती. तसेच त्यांना धड अन्न व पाणी ही दिले े नव्हते. अनेकांच्या अंगावर जखमा होत्या. त्यांना मलमपट्टीही केली नव्हती. अधिक चौकशी केली असता चार दिवसाच्या दिवाळी सुटीनंतर रविवारी कर्मचारी कामावर होते.

मितेश जैन यांनी आपले सहकारी बिमलेश नवानी, आरती खुराना, हर्षदा लाड, अमनप्रित वालीया, नंदा महाडीक,बीना सुरज,रवी यांच्यासोबत मृत दोन श्वानांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी परेल येथे पाठविण्याची मागणी केली. मात्र केंद्रचालक अ‍ॅड. दगडू लोंढे याने या कार्यर्क्त्यांना दमदाटी करत मृतदेह घोडबंदर येथील कोरा केंद्रात नेऊन फेकून दिले.याबाबत या कार्यकर्त्यांनी माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्र ार नोंदवून कोरा केंद्रात जाऊन श्वानांचे मृतदेह ताब्यात घेतले व ते विरारच्या करूणा ट्रस्टच्या रूग्णवाहिकेतून पुन्हा परेल येथे शवविच्छेदनासाठी पाठविले. याबाबत उत्कर्ष ए.बी.सी. केंद्रचालकावर पोलीसांनी व महापालिकेने काय कारवाई करण्यात केली याबाबत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

‘‘त्या दोन मृत श्वानांवर नसबंदी शस्त्र क्रि या करण्यात आली होती.त्यांचा मृत्यू कशामुळे झाला आहे याबाबत शवविच्छेदन अहवाल आल्यावर माहिती मिळेल. डॉग स्टीरिलायझेशन व मॉनीटरींग कंपनीमार्फत चौकशी केल्यावर कारवाई करू.
- सुखदेव दरवेशी, सहा. आयुक्त

मी कोणालाही दमदाटी केलेली नाही.श्वानांचा मृत्यू भुकेमूळे झाला हे खोटे आहे.आंम्ही श्वानांना दररोज चिकन व पेडीग्रीन देत असतो. काही वेळा शस्त्रक्रि येनंतर श्वान मृत होतात.
- दगडू लोंढे, केंद्रचालक

६ नोव्हेंबर रोजी ३ श्वान व १० नोव्हेंबर रोजी २ श्वानांचा मृत्यू झाला होता.हे प्रकरण दाबण्यासाठी अड. लोंढे यांनी आंम्हाला दमदाटी केली.श्वानांना अन्न पाणी दिले जात नाही हे प्रत्यक्ष आंम्ही पाहिले आहे.
-मितेश जैन, अ‍ॅनिमल वे. बोर्ड
 

Web Title: Extremely bad luck of Vasai Schwan Disinfection Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.