बनावट व्हिसा बनविणाऱ्याला सोपाऱ्यात मुद्देमालासह अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 11:47 PM2018-10-18T23:47:40+5:302018-10-18T23:47:51+5:30
२,४७,५५० रूपयांचा मुद्देमाल जप्त : खबऱयांनी दिला होता अलर्ट
नालासोपारा : नालासोपारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत श्रीपस्थ येथे बनावट व्हिसा बनवून देणाºया एका व्यक्तीला पोलीसांनी बुधवारी संध्याकाळी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून व्हिसा बनविण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्यात अनेक स्टॅम्प व कागदपत्रांचा अंतर्भाव आहे.
संगणक, स्कॅनर, प्रिंटर, ग्राफीक कार्ड, स्क्रिन बोर्ड, ट्यूब लाईट, प्रेस मशीन, भिंग, नंबरींग मशीन, सीडी/डिव्हीडी, कलर कॉम्पीनेशन बूक, वेगवेगळ्या कलेचे डब्बे, कागदाचे गठ्ठे व लॅमिनेशन रोल असा २,४७,५५० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नालासोपारा पश्चिम येथील श्रीप्रस्था कॉम्पेक्स, रूम नंबर ए/००२ , बिल्डींग नंबर ८४ येथे एक व्यक्ती बनावट दस्तऐवज तयार करून वेगवेगळ्या देशाचे बनावट व्हिसा बनवून देत असल्याची माहिती नालासोपारा पोलिसांना खबºयांकडून लागली होती. याबाबत अप्पर पोलिस अधीक्षक विजयकांत सागर, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता तोटेवाड, नालासोपारा वरिष्ठ पोलिस निरीक्षक के.डी. कोल्हे यांच्या सोबत पथकाने कारवाई करत सदर आरोपीला अटक केली.
या ओरोपिवर इमिग्रेशन अॅक्ट २४ (ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींकडून त्याचे इतर साथीदार कोण आहेत याची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती उपविभागीय पुलिस अधिकारी दत्ता तोटेवाड यांनी दिली.