कवडास ओव्हर फ्लो

By admin | Published: July 24, 2015 03:33 AM2015-07-24T03:33:22+5:302015-07-24T03:33:22+5:30

सतत दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे कासा भागातील कवडास धरण ओव्हर फ्लो झाले आहे. डहाणू तसेच पालघर तालुक्यांतील गावांना

False Over Flow | कवडास ओव्हर फ्लो

कवडास ओव्हर फ्लो

Next

कासा : सतत दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे कासा भागातील कवडास धरण ओव्हर फ्लो झाले आहे. डहाणू तसेच पालघर तालुक्यांतील गावांना उन्हाळ्यात शेतीला कालव्यांतर्गत पाणीपुरवठा केला जातो. सूर्या नदीवर धामणी धरणाखाली कवडास येथे हे धरण बांधण्यात आले आहे. उन्हाळ्यात धामणी धरणात आलेले पाणी येथे साठवून कालव्यांतर्गत ते शेतीला पाठविले जाते. दोन दिवसांपासून कवडास धरण ओसंडून वाहत आहे. सततच्या पावसामुळे नदीनाल्यांना पूर आला आहे.
भातसा धरणात
४१.३१ टक्के साठा
ठाणे : धरणांमधील पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. यानुसार भातसामध्ये ४१.३१ टक्के तर मोडकसागर मध्ये ६२.४८ टक्के पाणी साठा आहे. तानसा आणि बारवी धरणामध्ये अनुक्र मे ३६.९१ आणि २२.९९ टक्के पाणी साठा झाल्याची नोंद पाटबंधारे विभागाने केली आहे.

Web Title: False Over Flow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.