शेतकऱ्याची मुलगी झाली एमबीबीएस
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2020 01:06 AM2020-02-23T01:06:19+5:302020-02-23T01:06:40+5:30
अदिती पाटीलकडून वडिलांचे स्वप्न पूर्ण
मनोर : सागावे येथील मराठी माध्यमामध्ये शिक्षण घेणारी एका शेतकºयाची मुलगी अनंत अडचणींचा सामना करून एमबीबीएस झाल्याने सागावे व मनोर परिसरात तिचे कौतुक केले जात आहे.
पालघर तालुक्यातील सागावे येथील शेतकरी बाबुराव पाटील यांची मुलगी अदिती हिने एसटीने प्रवास करून भगिनी समाज मराठी शाळेत पहिली ते दहावी मराठी माध्यमामध्ये शिक्षण घेतले. वडिलांनी तिला सांगितले होते की, तुला डॉक्टर म्हणून बघायचे आहे. त्यासाठी तिने निश्चय केला आणि पुढचे शिक्षण घेण्यासाठी ती राजस्थानला गेली. तेथे सायन्सला अॅडमिशन घेतले. तिला राजस्थानी भाषा समजत नव्हती. परंतु हिंमत न हरता ती आत्मविश्वास, जिद्द आणि चिकाटीने मार्ग काढीत पुढे गेली. त्यानंतर पुढचे शिक्षण तिने विठ्ठलराव विखे-पाटील वैद्यकीय महाविद्यालय, अहमदनगर येथे घेऊन ती एमबीबीएस परीक्षेत पास झाली. आज ती डॉक्टर झाली असून तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
आई-वडिलांबरोबर मी एका हॉस्पिटलमध्ये गेले होते. तिथे अनेक मुली इंटर्नशीप करीत होत्या. तेव्हा पप्पा म्हणाले, मलाही तुला अशी बघायची आहे. तेव्हा मी निर्णय घेतला की, मला माझ्या पप्पांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. त्यानंतर जिद्द नि आत्मविश्वासाने मी शिक्षण घेऊ लागले.
- अदिती बाबुराव पाटील