शेतकरी-मच्छीमारांना ओखीचा फटका, २ हजार ३६६.५४ हेक्टर क्षेत्रावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 12:19 AM2017-12-08T00:19:26+5:302017-12-08T00:19:47+5:30

ओखी वादळाच्या अवकाळी पावसामुळे आठ तालुक्यातील शेतकº्यांनी एकूण २ हजार ३६६.५४ हेक्टर क्षेत्रात विविध वेल वर्गीय भाजीपाला आणि ३ हजार ९६३.३१ हेक्टर क्षेत्रात केलेल्या रब्बी पिकांना धोका निर्माण झाला आहे

Farmers-fishermen hit the area, resulting in 2 thousand 366.54 hectare area | शेतकरी-मच्छीमारांना ओखीचा फटका, २ हजार ३६६.५४ हेक्टर क्षेत्रावर परिणाम

शेतकरी-मच्छीमारांना ओखीचा फटका, २ हजार ३६६.५४ हेक्टर क्षेत्रावर परिणाम

Next

हितेन नाईक
पालघर : ओखी वादळाच्या अवकाळी पावसामुळे आठ तालुक्यातील शेतकº्यांनी एकूण २ हजार ३६६.५४ हेक्टर क्षेत्रात विविध वेल वर्गीय भाजीपाला आणि ३ हजार ९६३.३१ हेक्टर क्षेत्रात केलेल्या रब्बी पिकांना धोका निर्माण झाला आहे. या हंगामात पेरणी केलेली पिके वाया जाणार असल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे तर दुसरीकडे डहाणू, पालघर, वसई तालुक्यात मच्छीमारांच्या झालेल्या नुकसानीमुळे मच्छीमार व्यवसाय ही उध्वस्त होण्याच्या मार्गावर उभा राहिला आहे.
पालघर जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र ४ लाख ६९ हजार ६९९ हेक्टर इतके असून त्यातील १ लाख ३३ हजार ४७ हेक्टर क्षेत्र हे लागवडी खालील क्षेत्र गणले जाते. जिल्ह्यात १ लाख ४६ हजार ८५२ शेतकरी असून ७१ हजार ३३१ (४८ टक्के) शेतकरी हे अत्यल्प भूधारक, ४४ हजार ९३९ (३१ टक्के) शेतकरी अल्प भूधारक,तर ३० हजार ५२८ (२१ टक्के) शेतकरी इतर भूधारक आहेत. इतर ६६ हजार ६०० (४५ टक्के) शेतकरी हे आदिवासी आहेत.
जिल्ह्यातील आठही तालुक्यात सध्याच्या हंगामात टोमॅटो, भेंडी, वांगी, कारली, मिरची, कांदा, बटाटा, दुधी, पडवळ, ढोबळी मिरची, कोबी, फ्लॉवर, मेथी, कोथिंबीर, पालेभाज्या आदी एकूण २ हजार ३६६.५४ हेक्टर क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली असून जिल्ह्यात रब्बी पीक हंगामासाठी मका, गहू व इतर तृणधान्य, हरभरा, इतर कडधान्य, तीळ, सूर्यफूल व इतर गळीतधान्य साठी ३ हजार ९६३.३१ हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आली आहे. त्यातील वसई तालुका सोडल्यास सातही तालुक्यात हरभरा पीक मोठ्या प्रमाणात घेतले जात असून या पिकाअंतर्गत विविध तालुक्यात १३८८.८ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. या खालोखाल विविध कडधान्ये मिळून एकूण २०६८.४ हेक्टर क्षेत्र लागवडी खालील आहे. तसेच ४६६.५ हेक्टर क्षेत्र तीळ पिकाखालील आहे.
२० सप्टेंबर रोजी परतीच्या पावसाने तीन दिवस धुमाकूळ घातल्या नंतर कापून बांधावर सुकविण्यासाठी ठेवलेली पिके, कुजून साचलेल्या पाण्यावर तरंगून शेतकºयांचे मोठे नुकसान झाले होते.त्यानंतर उरलेली पावली ही ओखी वादळाच्या तडाख्याने कुजून गेल्याने शेतकºयांचे दुहेरी मोठे नुकसान झाले आहे. या पावसाचा फटका किनारपट्टीच्या पश्चिम भागाला मोठ्या प्रमाणात बसला असून किनारपट्टी पासून १० ते २० किलोमीटर भागात पडलेल्या मुसळधार पावसामुळे चिकू, आंबा, मिरची व फुले उत्पादकाना मोठा फटका बसणार आहे. रोपे कुजून अथवा विविध रोगांचा परिणाम होऊन मोठ्या प्रमाणात उत्पादन घटणार असल्याचे शेतकरी बागायतदारांचे म्हणणे आहे.
मुंबईहून गुजरातपर्यंत फेमस असलेला जिल्ह्यातील वसई व विक्र मगड तालुक्यातील मोगरा व इतर फुले,डहाणू तालुक्यातील लिली, जरबेरा, केळवे-माहीम मधील पानवेली आदी फुलांच्या उत्पादक बागायतदार- शेतकºयांनाही यामुळे मोठ्या तोट्याला सामोरे जावे लागणार आहे.
ठाणे, पालघर जिल्ह्याना ११२ किमीच्या सागरी किनारा प्राप्त झाला असून नायगाव ते बोर्डी किनाºया दरम्यान, एकूण ३ हजार २ नौकाद्वारे मासेमारी केली जाते. ५१ सहकारी संस्थांच्या माध्यमातून मासे खरेदी-विक्र ी केली जात असून वर्षभरात ३ हजार मेट्रिक टन उत्पादन होते. वसई, उत्तन, पालघर, डहाणू मधून दिड ते दोन हजार बोटी द्वारे पापलेट, दाढा, घोळ, वाम, सुरमई आदी माश्यांची मासेमारी केली जाते. किनाºयावरून ४० ते ५० नॉटिकल समुद्री क्षेत्रातून ओखी वादळाच्या इशाºयावरून प्रशासनाने माघारी परत बोलविल्या मुळे मासेमारी न करताच त्यांना रिकाम्या हाताने परत बंदरात यावे लागल्याने त्यांचे डिझेल, बर्फ, आॅइल, मजुरी इ.चा लाखो रु पयांचा खर्च वाया गेला आहे. पालघर व डहाणू तालुक्यात मोठया प्रमाणात बोंबील, मांदेळी, करंदी माश्यांची मासेमारी करून ती सुकवून त्याची विक्र ी केली जाते. त्यांनी पकडून आणलेली व वाळत घातलेले सर्व मासे ह्या पावसात भिजून,कुजून खराब झाल्याने मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले आहे.ह्या सर्वांच्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करून त्यांना शासनाने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी मच्छीमार संघटनांनी केली आहे.

बोर्डी : ओखी वादळाच्या तडाख्याने डहाणू खाडीत नांगरलेली जलारामप्रसाद (आयएनडी-एमएच-२-एमएम २६१३) ही नौका सोमवारी मध्यरात्रीपासून बेपत्ता झाली होती. त्यानंतर नौकामालक प्रकाश दामोदर धानमेहेर यांनी स्थानिकांच्या मदतीने शोधमोहीम हाती घेतली होती. दरम्यान, खाडीत शेकडो बोटी नांगरलेल्या असताना त्या परिसरातच शोधकार्याला यश आले असून पाण्यात बुडालेली नौका सापडल्याची माहिती बोटमालकांनी प्रशासनाला कळवली आहे.

Web Title: Farmers-fishermen hit the area, resulting in 2 thousand 366.54 hectare area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.