लाकडी नांगरवापराकडे शेतकऱ्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 12:16 AM2019-08-01T00:16:22+5:302019-08-01T00:16:34+5:30

पॉवर टिलरचा वाढता वापर : शेती होते आधुनिक पद्धतीने

Farmers' lesson toward wood plowing | लाकडी नांगरवापराकडे शेतकऱ्यांची पाठ

लाकडी नांगरवापराकडे शेतकऱ्यांची पाठ

googlenewsNext

शशिकांत ठाकूर

कासा : पावसाळा आला की, ग्रामीण भागात जागोजागी शेतीची कामे सुरू असलेली दिसतात. हिरवीगार शेती आणि पेरणी, चिखळणीसाठी चालणारे नांगर आणि त्यांना हाकणाºया शेतकऱ्यांचा आवाज व सोबतच सतत नांगर ओढणारी बैलांची जोडी, हे दृश्य नेहमीचेच. मात्र, काळानुसार शेतीच्या पद्धतीमध्येही बदल झाला असून आजच्या आधुनिक काळात बैलांची नांगरणी थांबली असून त्याऐवजी शेतकरी ‘पॉवर टिलर’ वापराकडे वळताना दिसत आहेत.

ग्रामीण भागातील शेतकरी आता मशागतीच्या कामासाठी पॉवर टिलर वापरू लागला आहे. लाकडी नांगराऐवजी पॉवर टिलरचा वापर केल्याने शेतकºयांचा वेळ, पैसा तसेच शारीरिक श्रम देखील वाचतात. साधारणपणे पॉवर टिलर दोन तासांत एक हेक्टर जमीन नांगरतो. त्यामुळे नांगराच्या तुलनेत कमीत कमी वेळात जास्त जमीन नांगरली जात असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.
पूर्वीच्या काळी शेतकरी लावणी, नांगरणी, पेरणी आदी कामांसाठी एकमेकांच्या शेतात जाऊन मदत करत असत. परंतु आता मजुरांची टंचाई व पावसाचा अनियमितपणा यामुळे प्रत्येक शेतकरी आपल्या परीने आपली शेतीची कामे रोपणी, पेरणी लवकर करण्याचा प्रयत्न करतात. पॉवर टिलर भाड्याने घेणाºया शेतकºयांना ४०० रूपये प्रती तास भावाने पैसे मोजावे लागतात. त्यामुळे बरेच शेतकरी शेतीच्या कामासाठी लाकडी नांगराऐवजी लवकर काम पूर्ण करण्यासाठी पॉवर टिलर वापरत आहेत. पॉवर टिलरच्या वापरामुळे बैलगाड्या आणि लाकडी नांगराच्या तुलनेत शेतकºयांना आता जास्त खर्च होतो. परंतु कामे वेळेत होतात.
सध्या बाजारात एका बैलजोडीची किंमत ३० ते ४५ हजारांवर पोहोचली आहे. तसेच भाडेतत्त्वावर बैलजोड्याही नाहीत. त्याचप्रमाणे वर्षभर बैलांची राखण करणे त्यासाठी एखाद्या गुराखी ठेवावा लागतो. तसेच बैलांना चारा, खाद्य पुरविणे या गोष्टी शेतकºयांना वर्षभर कराव्या लागतात. तसेच पॉवर टिलर आणि ट्रॅक्टर खरेदीसाठी शेतकºयांना आणि महिला बचत गटांना ३५ ते ५० टक्के अनुदान शसनाच्या कृषी विभागाकडून मिळते.

खेड्यापाड्यातील शेतकरी म्हटला म्हणजे त्याच्याकडे डौलदार बैलांची जोडी, लाकडी नांगराच्या एक दोन जोड्या, बैलगाडी ही असणारच असा समज. जून महिना उजाडला की, शेतकरी जमीन मशागतीसाठी नांगर दुरूस्ती करणे, नवीन नांगर तयार करणे, एखादा बैल कमी असल्यास बैल शोधणे, नवीन बैल खरेदी करणे किंवा भाड्याने बैल आणणे, नांगरासाठी व चिखलणीसाठी लागणाºया फळीसाठी मजबूत लाकूड शोधणे अशा कामांची शेतकºयांची लगबग सुरू होते. शिवाय, नांगर मजबूत टिकाऊ असावा, यासाठी शेतकरी साग, शिसव, खैर यासारख्या झाडाच्या लाकडाचा वापर करतात.
 

Web Title: Farmers' lesson toward wood plowing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.