वनविभागाच्या आदेशा विरोधात शेतकरी मार्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 02:25 AM2018-04-19T02:25:35+5:302018-04-19T02:25:35+5:30
निवेदन दिले : आमच्यावर अन्याय करू नका
जव्हार : तालुक्यातील प्लॉट धारक शेतकऱ्यांनी पालापाचोळा जमा करुन शेतात भाजणी केलेल्या शेतकºयांवर गुन्हा नोंदविण्याविषयी वनविभागाने काढलेल्या पत्रकाविरोधात सोमवारी शेतकºयांनी मोर्चा काढला. जव्हार वनविभागाच्या वनसंरक्षक अमितकुमार मित्रा यांच्या एकांगी वागण्याने शेतकºयांना मोठी समस्या निर्माण झाली असून त्यांनी या मार्चाच्या माध्यमातुन आपला आक्रोश व्यक्त केला.
वास्तविक, दोन महिन्यावर पावसाळा आल्याने शेतकरी जमिन भाजणीची कामे करीत आहेत. मात्र, त्याविरोधामध्ये वनविभागाने थेट नोटीस देऊन कारवाई व गुन्हे दाखल करण्याची भाषा केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्या विरोधात विनविभागाला जाग यावी म्हणून सर्व शेतकºयांनी किसान सभेच्या नेतृत्वाखाली वनविभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढला.
नाशिक ते मुंबई मंत्रालयावर पायी चालून धकड मोर्चा काढणाºया शेतकºयांच्या मागाण्यांना मुख्यमंत्र्यांनी हिरवा सिग्नल देत त्या मान्य करीत लेखी निवेदन दिले. मात्र, जव्हार वनविभागाचे उपवन संरक्षक अमितकुमार मित्रा यांनी शेतकºयांवर गुन्हे दाखल करायला लावले आहेत. तसेच, शेतीसाठी जंगलात राबणी करून भाजणी केलेल्या शेतकºयांनावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. ते गुन्हे नोंदवू नये, शेतकºयांना सहकार्य करावे आणि शेतकºयांनी जंगलात कुठेही वणवे आग लावलेली नाही. तरीही वनविभागाने शेतकºयांना न्याय द्यावा अशी मागणी शेतकºयांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी जि. प. सदस्य रतन बुधर, प.स. सदस्य यशवंत घाटाळ, लक्ष्मण जाधव यशवंत आदी नेत्यांनी शेतकºयांना मार्गदर्शन केले.