पालघरमधील शेतकऱ्यांनी उतरवला पीकविमा, तांत्रिक अडचणींमुळे विलंब
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 01:02 AM2019-08-12T01:02:29+5:302019-08-12T01:02:54+5:30
प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत ठाणे, पालघर या दोन्ही जिल्ह्यांतील १७ हजार ७७९ शेतकऱ्यांनी पीकविमा उतरवला आहे.
- सुरेश लोखंडे
ठाणे : प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत ठाणे, पालघर या दोन्ही जिल्ह्यांतील १७ हजार ७७९ शेतकऱ्यांनी पीकविमा उतरवला आहे. त्यासाठी एक कोटी १५ लाख १२ हजार रुपये विमा हप्ता भरला आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील ९३५९ शेतकºयांनी ५० लाख ४८० हजारांचा, तर पालघर जिल्ह्यातील ८४२० शेतकºयांनी ६४ लाख ६५ हजारांचा पीकविमा उतरवला आहे.
गेल्या पाच वर्षांत जवळपास एक लाख ४७ हजार ४१३ शेतकºयांनी विविध पिकांचा विमा उतरविला आहे़ मात्र, यंदा तांत्रिक अडचणीमुळे पीकविमा भरण्यास होणारा विलंब लक्षात घेऊन शासनाच्या वतीने पीकविमा भरण्याची मुदत वाढविली असून ३१ जुलैपर्यंत शेतकºयांना पीकविमा भरता येणार आहे़
प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत ठाणे, पालघर जिल्ह्यांतील जवळपास एक लाख ४७ हजार ४१३ शेतकºयांनी २०१४ ते १९ या कालावधीत खरीप हंगामातील भात, सोयाबीन, नागली, वरी आदी पिकांचा पीकविमा उतरविला असून विमा हप्त्यापोटी आठ कोटी ३० लाख ३० हजार रुपये भरले आहेत़ पालघर जिल्ह्यातील १० हजार ५७१ शेतकºयांनी गेल्या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये पीकविमा उतरवून त्यापोटी ६२ लाख ३२ हजार ६३७ रुपये विमा हप्त्याची रक्कम भरलेली आहे.
विमा संरक्षण कोणाला?
प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास या योजनेत सहभागी शेतकºयांना विमा संरक्षण.
विमा हप्ता किती?
खरीप हंगामातील पिकांसाठी शेतकºयांना अन्नधान्य व गळीत धान्य पिकांकरिता विमा संरक्षित रकमेच्या २ टक्के तर नगदी पिकांकरिता ५ टक्के हप्ता.
पाच वर्षे दुष्काळाचीच! किती मिळाली भरपाई
2014-15
सुमारे ३२ हजार ५८५ शेतक-यांनी एक कोटी ५३ लाख रुपये विमा हप्ता भरला होता़ केवळ 9.62 कोटी रूपये नुकसानभरपाई म्हणून देण्यात आले.
2015-16
२८ हजार ७५८ शेतकºयांनी आठ कोटी २३ रूपये विमा हप्ता भरला होता़ केवळ 8.70 कोटी रूपये नुकसान भरपाई म्हणून २३ हजार ३७२ शेतक-यांना
देण्यात आले.
2016-17
३५ हजार २८८ शेतक-यांनी २.१७ कोटी रूपये विमा हप्ता भरला होता़ केवळ भरपाई नाही.
2017-18
२६ हजार ७२४ शेतकºयांनी ७९.४९ कोटी रूपये विमा हप्ता भरला होता़ केवळ 3.74 कोटी रूपये नुकसान भरपाई म्हणून पाच हजार ३५८ शेतकºयांना
देण्यात आले़
2018-19
एक लाख ४७ हजार ४१३ शेतकºयांनी आठ कोटी ३० लाख रूपये विमा हप्ता भरला होता़ यात 17.59 कोटी रूपये नुकसान भरपाई म्हणून ५७ हजार २७९ शेतकºयांना
देण्यात आले़