अवकाळीच्या नुकसानीचा शेतकऱ्यांना दुसरा हप्ता प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 11:05 PM2019-12-28T23:05:39+5:302019-12-28T23:05:46+5:30
२१ कोटी २६ लाख जिल्हा प्रशासनाकडे वर्ग; मच्छीमारांच्या तोंडाला पाने पुसली
- हितेन नाईक
पालघर : जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या भातशेती व फळ-फुले बागायतींच्या नुकसान भरपाईच्या मागणीचा २१ कोटी २६ लाख रुपयांचा दुसरा हप्ता प्राप्त झाला असून त्याचे वाटप शेतकºयांना करण्यात आले आहे. तिसरा हप्ता मिळण्यासाठी जिल्हा पातळीवरून प्रयत्न केले जात असून शेतकºयांचे दु:ख हलके करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक तरकसे यांनी दिली.
सप्टेंबर ते नोव्हेंबरदरम्यान पडलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील सुमारे १ लाख १४ हजार शेतकºयांच्या भातशेती व बागायतींचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकºयांना सुमारे ४० कोटी १३ लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळण्याची मागणी राज्य शासनाकडे जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली होती. त्यापैकी राज्य शासनाने १८ नोव्हेंबर रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार पालघर जिल्ह्याला नुकसान भरपाईचा पहिल्या टप्प्यात सुमारे २६ हजार ४१७ शेतकºयांसाठी ९ कोटी ७३ लाख रुपये निधी प्राप्त झाल्यानंतर त्याचे वाटप करण्यात आले होते. त्यानंतर राज्य शासनाकडून जिल्ह्याला मिळालेल्या दुसºया हप्त्यात ३८ हजार ८८ शेतकºयांना २१ कोटी २६ लाख रुपयांच्या निधीचे वितरण जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आले आहे.
आतापर्यंत जिल्हा प्रशासनाला पहिला व दुसरा टप्पा असे मिळून एकूण ३० कोटी ११ लाख रुपयांचा नुकसानग्रस्त निधी प्राप्त झालेला आहे. पालघर जिल्ह्यातून १ लाख १४ हजार नुकसानग्रस्त शेतकºयांसाठी प्रति हेक्टरी ६ हजार ८०० रुपये ठरवल्यानुसार ३४ कोटींची मागणी जिल्हा प्रशासनाने राज्याकडे केली होती. त्यानंतर राज्य शासनाने ही भरपाई प्रति हेक्टरी ८ हजार भात पिकासाठी तर १८ हजार फळ पिकासाठी वाढवून दिल्याने राज्य शासनाने ठरवून दिलेल्या नवीन नुकसान भरपाईच्या नियमानुसार ही भरपाई जिल्ह्यासाठी ४० कोटी १३ लाख इतकी ठरविण्यात आली. यापैकी सुमारे ९ कोटी ७३ लाखांचा पहिला तर २१ कोटी २६ लाखाचा दुसरा हप्ता आतापर्यंत जिल्हा प्रशासनाकडे राज्य शासनाकडून वर्ग झालेला आहे. यातील उर्वरित ९ कोटींचा निधी येणे बाकी असून तो निधी लवकरच प्राप्त होईल, असा आशावाद जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. दुसºया हप्त्यातील २१ कोटी रकमेपैकी काही रक्कम शेतकºयांच्या खात्यावर जमा झाली असून त्यातील काही रक्कम शेतकºयांच्या खात्यावर वाटप करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.
मच्छीमार संस्थांचे तीन कोटी ३७ लाखांचे नुकसान
जिल्ह्यातील झाई-बोर्डी ते वसईच्या नायगाव दरम्यानच्या २६ मच्छीमार सहकारी संस्थांच्या सभासदांच्या बोटी क्यार व चक्रीवादळामुळे समुद्रात मासेमारीसाठी जाऊ शकल्या नाहीत. त्यामुळे त्यांचे मासेमारीचे दिवस वाया गेले होते. तर खोल समुद्रात मासेमारीला बोटी गेल्या असताना अचानक समुद्रात निर्माण झालेल्या चक्र ीवादळाच्या तडाख्याने जीवित वा वित्तहानी होऊ नये म्हणून त्यांना जिल्हा प्रशासनाने तत्काळ माघारी बोलावण्यात आल्याने त्यांचे डिझेल, बर्फ व कामगारांचा पगार आदीचे नुकसान झाले होते. तसेच मासेमारी करून आणलेले व किनाºयावर वाळत घातलेले मासे अवकाळी पावसाने कुजून खराब झाल्याने २६ मच्छीमार सहकारी संस्थांकडून ३ कोटी ३७ लाख ९० हजाराचे नुकसान झाल्याचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय विभाग, पालघर (ठाणे) यांच्याकडून शासनाकडे पाठविण्यात आलेला आहे. परंतु आज राज्य शासनाकडून शेतकºयांना ४० कोटींपैकी २१ कोटी २६ लाखाची नुकसान भरपाई देण्यात आली असताना मच्छीमाराना नुकसान भरपाईपोटी एक छदामही मिळालेली नाही. त्यामुळे वर्षाला कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन आणि हजारो आदिवासी बांधवांना रोजगार मिळवून देणाºया मच्छीमार समाजाबाबत दुजाभाव का दाखविला जातो? असा प्रश्न आता मच्छिमार समाजातून विचारला जाऊ लागला असून मच्छिमार समाजात मोठी नाराजी पसरली आहे.