शहापुरातील शेतकऱ्यांना १९ डिसेंबरपासून पाणी
By admin | Published: November 23, 2015 01:04 AM2015-11-23T01:04:46+5:302015-11-23T01:04:46+5:30
शहापूर तालुक्यातील भातसा धरणाच्या उजव्या कालव्यालगत शेतीला या वर्षी पाणी मिळणार नाही, या वावड्यांना पेव फुटलेले असतानाच येत्या १९ डिसेंबरपासून दरवर्षीप्रमाणे पाणी सोडण्यात
भातसानगर : शहापूर तालुक्यातील भातसा धरणाच्या उजव्या कालव्यालगत शेतीला या वर्षी पाणी मिळणार नाही, या वावड्यांना पेव फुटलेले असतानाच येत्या १९ डिसेंबरपासून दरवर्षीप्रमाणे पाणी सोडण्यात येणार असल्याच्या निर्णयाने वावड्यांना खीळ बसून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
तालुक्यातील मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्वात मोठ्या भातसा धरण उजव्या कालव्यालगत असणाऱ्या शेतीसाठी दरवर्षी पाणी सोडले जाते.
या वर्षी मागील वर्षीपेक्षा पाऊस कमी पडल्याने व भातसा धरण रिकामे राहिल्याने वीजनिर्मितीद्वारे सोडल्या जाणाऱ्या पाण्यात ३० टक्के कपात केली आहे.
या कपातीमुळे वीजनिर्मितीवर परिणाम झालेला असतानाच या पाणीकपातीमुळे कालव्यालगत शेतीलाही पाणी मिळणार नसल्याच्या वावड्या तालुक्यात उठल्याने अनेक संघटना आक्रमक झाल्या होत्या. (वार्ताहर)