सूर्याच्या पाण्यापासून विक्रमगडचे शेतकरी वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 12:55 AM2019-04-22T00:55:38+5:302019-04-22T00:55:54+5:30
धरण उशाला; तरी कोरड घशाला
विक्रमगड : तालुक्यात १९७८ साली धामणी-कवडास या ठिकाणी सूर्या धरणाचे काम सुरु करण्यांत आले होते़ हे धरण विक्रमगड तालुक्यात येत असून या धरणांत लाखो गॅलन पाण्याचा मोठा साठा आहे़ परंतु गेल्या २० ते २५ वर्षात या धरणातील पाण्याच्यासाठयापैकी १ लिटर पाणी देखील स्थानिक लहान मोठया शेतकरी वर्गास गाव-पाडयांतील रहिवाशांच्या गावात पुरविण्यांत आले नसल्याचा आरोप येथील जनता करीत आहे़ या धरणाच्या पाण्यापासून विक्रमगड तालुका वंचित राहीलेला आहे.एकीकडे पाणी टंचाई व पाण्याचा साठा असूनही पाण्यापासुन वंचित राहावे लागत आहे अशी खंत येथील शेतकरी वर्ग व्यक्त करीत आहे.
विक्रमगड तालुक्यांतील बहुसंख्य शेतक-यांना हया धरणाचे पाणी देण्यासाठी साधा विचार देखील झाल्याचे दिसून येत नाही़ विक्रमगड तालुक्यातील तलवाडा मार्गे हे पाणी विक्रमगड तालुक्यात फिरविले तर हजारो हेक्टर जमीन ओलीताखाली येऊन शेतकरीवर्गाचा मोठा फायदा होईल़ व नगदी पिके घेता येऊन त्यांची आर्थिक उन्नती होईल़ या भागातील शेतकरी फुलबाग (मोगरा, झेंडु आदी़), भाजीपाला (गवार वगैरे) कडधान्यांमध्ये (काळा हरभरा), बागायतीमध्ये (आंबा, चिकू) यांसारख्या नगदी पिकांचे उत्पादन घेत आहे ज़र या धरणाचे पाणी या तालुक्यांस दिले गेले तर येथील शेतकरी द्राक्षे, ऊस अशा बारमाही पिकांचे उत्पादन वाढवू शकतील़व निश्चितपणे पश्चिम महाराष्टÑाप्रमाणे पिके घेऊ शकल्यास त्यांना दुधाचा व पोल्ट्रीचा व्यवसाय करता येईल.
तालुक्याची उन्नती होईल
स्थंलातरीत जो मजुर आहे त्यांस देखील जागेवर काम मिळेल व त्यांची परवड थांबेल त्यामुळे संबंधीत विभाग व शासनाने यांचा सखोल गांभीर्यपूर्वक विचार करणे गरजेचे आहे़ विक्रमगड तालुक्यांत धरण आहे परंतु त्यांचा लाभ शेजारील ५ तालुक्यांस होतो व तेथील शेतकरी वर्ग नगदी पिके घेवुन आपली प्रगती करीत आहेत.