पोल्ट्री व्यावसायिकांचे उपोषण
By admin | Published: October 28, 2015 12:41 AM2015-10-28T00:41:11+5:302015-10-28T00:41:11+5:30
शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी कुक्कुटपालनाचा व्यवसाय करतात. यासाठी लागणारे साहित्य या कंपन्या पुरवितात मात्र या कंपन्यांवर प्रशासन अथवा शासनाचे नियंत्रण नसल्याने त्यांची मनमानी सुरू आहे
वाडा : शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी कुक्कुटपालनाचा व्यवसाय करतात. यासाठी लागणारे साहित्य या कंपन्या पुरवितात मात्र या कंपन्यांवर प्रशासन अथवा शासनाचे नियंत्रण नसल्याने त्यांची मनमानी सुरू आहे. शेतकऱ्यांची लूट थांबवावी आणि कंपन्यांवर अंकुश लावावा या मागणीसाठी येथील शेतकऱ्यांनी मंगळवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. अनंत सुर्वे, राहुल पाटील, व राजेंद्र ठाकरे हे प्रातिनिधीक स्वरूपात उपोषणास बसले आहेत.
जिल्ह्यात शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, शेळ्या पालन असे अनेक लहानसहान व्यवसाय करून आपला तसेच कुटुंबाचा गाडा ढकलण्याचा प्रयत्न करतात. कुक्कुटपालन या व्यवसायात सगुणा, व्यंकटेश्वरा, प्रिमियम, आनंद अॅग्रो या सारख्या कंपन्या शेतकऱ्यांना पिल्लू, खाद्य आणि इतर अनेक गोष्टी पुरवतात. मात्र, कंपन्या ऋतुमानानुसार खराब हवामानात व्यवसायातील तोट्याला शेतकऱ्यांना जबाबदार धरतात आणि त्यांच्या हक्काचे आणि परिश्रमाचे पैसे कापून घेतात. यामुळे शेतकरी आत्महत्येचा पर्याय निवडत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. (वार्ताहर)