भीक कमी आणल्याने बापानेच केली चिमुरड्याला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 12:51 AM2020-02-07T00:51:44+5:302020-02-07T00:52:31+5:30

आदिवासी समजातील संजय हा त्याची पत्नी आणि चिमुकला सूर्या याला जबरदस्तीने भीक मागायला लावत होता.

Father fight child by bringing down begging | भीक कमी आणल्याने बापानेच केली चिमुरड्याला मारहाण

भीक कमी आणल्याने बापानेच केली चिमुरड्याला मारहाण

Next

पालघर : नेहमीपेक्षा कमी भीक आणल्याने आपल्या पाचवर्षीय चिमुकल्याला निर्दयी बापाने जाड दांडूक्याने हातावर मारहाण करत त्याचा हात मोडेस्तोवर त्याला मारले. ‘बाबाल्हा पैसं नाय दिलं, तय त्याहान माना मरेस्तोवर कुटला’, असे तो चिमुकला सूर्या कळवळून आपल्या वेदना दाबीत सांगत होता. सूर्याला मारल्याप्रकरणी त्याचा बाप संजय याचा जाबजबाब पोलिसांनी घेतला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

आदिवासी समजातील संजय हा त्याची पत्नी आणि चिमुकला सूर्या याला जबरदस्तीने भीक मागायला लावत होता. शनिवारी सूर्या पालघर शहरात नेहमीप्रमाणे भीक मागून घरी आला. घरी आल्यानंतर दिवसाची किती कमाई झाली असे विचारीत बापाने जमलेले पैसे देण्याची मागणी केली. कमी पैसे हातावर पडल्याचे दिसल्यावर संतप्त बापाने बाजूलाच पडलेला दंडुका उचलून पोटच्या पोराला अमानुषरित्या मारायला सुरुवात केली.

वेदनेने विव्हळत जोरजोरात ओरडणाऱ्या मुलाचा आक्रोश एकूण शेजाऱ्याने सूर्याची नराधम बापाच्या हातून सुटका केली. तरीही मंगळवारी पालघर शहरातील भाजी मार्केटमधील बिकानेरी खाऊ गल्ली येथे सूर्या नेहमीप्रमाणे भीक मागण्यासाठी उभा राहिला. तिथे उभा राहून वेदनेने विव्हळत रडत - रडत येणाऱ्या जाणाऱ्यांकडे पैसे मागत होता. खाऊ गल्लीत आलेल्या काही तरुणांनी त्याला रडण्याचे कारण विचारले. मात्र सुरुवातीला तो काहीच बोलला नाही. मुलांनी त्याला प्रेमाने विश्वासात घेतल्यावर तो बोलू लागला.

लक्ष देण्यासही कोणी नाही

प्रथम बोरडेकर, केवल घरत, सनी जैन, पिंटू ठाकूर या तरुणांनी सूयार्ला घेऊन थेट ग्रामीण रुग्णालय गाठले. तिथे आल्यानंतर डॉक्टरांनी त्याची तपासणी केल्यावर त्याच्या डाव्या हाताचे हाड मोडल्याचे लक्षात आले. बुधवारी अस्थिरोग तज्ज्ञांनी त्याची तपासणी केली.

Web Title: Father fight child by bringing down begging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.