सातपाटी बंधाऱ्याचे भूमीपूजन, उधाणाचे भय घटले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 11:30 PM2019-03-04T23:30:00+5:302019-03-04T23:30:07+5:30

सातपाटी गावाचा कर्दनकाळ ठरणाऱ्या समुद्राच्या लाटा रोखण्यासाठी बंधारा पुनर्बांधणीसाठी ५ कोटी ३७ लाखाच्या निधीला शासन पातळीवरून मंजुरी मिळाली.

The fear of euphoria, the fear of euphoria, and the decline of the earthquake of Satpati Bandh decreased | सातपाटी बंधाऱ्याचे भूमीपूजन, उधाणाचे भय घटले

सातपाटी बंधाऱ्याचे भूमीपूजन, उधाणाचे भय घटले

Next

- हितेंन नाईक
पालघर : सातपाटी ग्रामपंचायतीने उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका आणि खासदार राजेंद्र गावितांनी प्रशासकीय पातळीवर केलेल्या प्रयत्नांना यश आल्याने सातपाटी गावाचा कर्दनकाळ ठरणाऱ्या समुद्राच्या लाटा रोखण्यासाठी बंधारा पुनर्बांधणीसाठी ५ कोटी ३७ लाखाच्या निधीला शासन पातळीवरून मंजुरी मिळाली. सोमवारी त्यांंच्या हस्ते भूमिपूजन पार पडल्यानंतर कामाला सुरु वात करण्यात आली.
सातपाटीच्या पश्चिमेकडून येणाºया उधाणाच्या लाटा थोपवून धरण्यासाठी सन २०१२ रोजी बांधलेला बंधारा कोसळल्याने समुद्राचे पाणी गावात शिरून मोठ्या वित्तहानीच्या घटना घडू लागल्या होत्या. जिल्ह्यातील किनारपट्टीवरील गावात अशीच भयावह परिस्थिती निर्माण झाल्यानंतर ग्रामपंचायत, सहकारी संस्थांच्या मागणी वर शासन पातळीवर सादर करण्यात आलेल्या कोस्टल झोन प्लॅन मध्ये जिल्ह्यातील पालघर, डहाणू आणि वसई तालुक्यातील धूपप्रतिबंधक बंधाऱ्यां मंजुरी देण्यात आली होती. मात्र केंद्रीय सीआरझेड विभागाने नाकारलेल्या परवानग्या आणि काही पर्यावरणवाद्यांनी हरित लवादात दाखल केलेली याचिकामुळे तिन्ही तालुक्यातील मंजूर बंधाºयांच्या कामाना स्थगिती देण्यात आली. त्याचा मोठा गंभीर परिणाम किनारपट्टीवरील गावांना भोगावा लागून सातपाटी गावातील सुमारे ३०० घरांमध्ये पाणी घुसून मोठी वित्तहानी घडली होती.
समुद्राच्या पाण्याची सतत वाढणारी पातळी आणि जिवीतहानीची शक्यता पाहता सातपाटीच्या पश्चिमेकडे बंधारा बांधणे खूप गरजेचे असल्याने ग्रामपंचायतीने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. ह्या याचिकेच्या सुनावणीत न्यायालयाने ह्या बंधाºयाच्या दुरुस्तीसाठी राज्यशासनाने तात्काळ पावले उचलण्याचे आदेश दिले होते. तसेच किनारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, बांद्रा यांनी राष्ट्रीय आपदा प्रतिबंधक अधिनियम २००५ अन्वये सातपाटी येथे धुपप्रतिबंधक बंधारा बांधण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्या अनुषंगाने बंधाºयाची पुनर्बांधणी आणि उंची वाढविणे गरजेचे असल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे ह्यांनी आपल्याला असलेल्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २०९५ मधील कलम ३०(२) व कलम ७२ च्या तरतुदी नुसार असलेल्या बंधारा दुरु स्तीच्या कामाला ५ फेब्रुवारी २०१९ रोजी मंजुरी दिली होती.
बंधारा उभारणीच्या कामाला मंजुरी देण्यात आल्यानंतर खासदार राजेंद्र गावित, आमदार अमित घोडा,जिप उपाध्यक्ष सचिन पाटील,पं. स.सदस्य मुकेश मेहेर आदींच्या पाठपुराव्याने ४२५ मीटर्स लांबीच्या व ४ कोटी ३७ लाखाच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. उर्वरीत १ कोटीच्या कामाचे टेंडर लवकरच निघणार असल्याचे बंदर विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले. यावेळी सचिन पाटील, मुकेश मेहेर, राजन मेहेर, ज्योती मेहेर, सरपंच अरविंद पाटील, पंकज पाटील, रवींद्र म्हात्रे, विश्वास पाटील, सुरेश म्हात्रे, तानाजी चौधरी, आदीसह मच्छीमार उपस्थित होते.
>...तर राजीनामा देईन!
वाढवणं बंदर आणि जिंदाल जेट्टी ला परवानगी मिळाल्याची माहिती पुढे येत असल्याने ह्यामुळे पूर्ण मच्छीमार उद्धवस्त होणार असल्याचा मुद्दा रवींद्र म्हात्रे ह्यांनी उपस्थित केला असता ही दोन्ही बंदरे होणार नसल्याचे सांगून तशी वेळ आल्यास मी माझ्या खासदारकीचा, पदांचा राजीनामा देईन असे सांगितले.त्यावर भूमिपुत्रांनी समाधान व्यक्त केले. बंधाºयाच्या पुनर्बांधणीच्या कामाचे भूमिपूजन करताना गावित, पदाधिकारी,ग्रामस्थ आदी.

Web Title: The fear of euphoria, the fear of euphoria, and the decline of the earthquake of Satpati Bandh decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.