बाडा पोखरण योजनेतील २९ गावांचा पाणीपुरवठा बंद होण्याची भीती?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 12:09 AM2020-05-21T00:09:26+5:302020-05-21T00:09:54+5:30
ग्रामपंचायत या पाण्याचे बिल दरमहा जिल्हा परिषदेला भरत असते. तर, जिल्हा परिषद ठेकेदारामार्फत जलशुद्धीकरण केंद्राला क्लोरिन पावडर पुरवते.
डहाणू : डहाणूच्या पश्चिम किनारपट्टी भागातील २९ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या बाडा पोखरण प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेतून होणारा पुरवठा शुक्रवारपासून बंद होण्याची भीती आहे. वास्तविक, साखरा धरणात मुबलक पाणी आहे. परंतु, पाणीपुरवठा विभागाच्या भोंगळ कारभारामुळे येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्धीकरणासाठी आवश्यक क्लोरिन टी.सी.एल.चा पुरवठा न झाल्याने संबंधित गावांचा पाणीपुरवठा बंद होणार आहे. या धरणातून येणारे पाणी शुद्धीकरण न करता तसेच सोडले तर कोरोनाच्या या दिवसांत सर्दी, ताप, खोकला, कावीळ रोगांची लागण होण्याची भीती आहे.
ग्रामपंचायत या पाण्याचे बिल दरमहा जिल्हा परिषदेला भरत असते. तर, जिल्हा परिषद ठेकेदारामार्फत जलशुद्धीकरण केंद्राला क्लोरिन पावडर पुरवते.
क्लोरिन पावडरपुरवठा करणाºया ठेकेदाराला वर्कआॅर्डर दिली आहे. लवकरच ते उपलब्ध होऊन पाणीपुरवठा सुरळीत राहील.
पी.एस. कुलकर्णी, उपअभियंता. पाणीपुरवठा विभाग, डहाणू