डीजींच्या हस्ते मिलन तरे यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 02:49 AM2018-07-09T02:49:57+5:302018-07-09T02:50:32+5:30
सातपाटी बंदरातून खोल समुद्रात मासेमारीला गेलेली बोट बुडाल्यानंतर संकटात सापडलेल्या ११ मच्छीमार बांधवाची सुखरूप सुटका करणाऱ्या सातपाटी येथील मिलन शंकर तरे याचा ‘नॅशनल महाराष्ट्र मेरिटाईम सर्च अँड रेस्क्यू पुरस्कार’ डायरेक्टर जनरल राजेंद्र सिंह यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे देण्यात आला.
पालघर - सातपाटी बंदरातून खोल समुद्रात मासेमारीला गेलेली बोट बुडाल्यानंतर संकटात सापडलेल्या ११ मच्छीमार बांधवाची सुखरूप सुटका करणाऱ्या सातपाटी येथील मिलन शंकर तरे याचा ‘नॅशनल महाराष्ट्र मेरिटाईम सर्च अँड रेस्क्यू पुरस्कार’ डायरेक्टर जनरल राजेंद्र सिंह यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे देण्यात आला.
सातपाटी बंदरातून ९ मे रोजी खोल समुद्रात मासेमारीला गेलेल्या ‘शिवनेरी’ बोटीला जोरदार लाटांचा तडाखा बसून बोट बुडाल्या नंतर त्यातील ११ खलाशी आणि तांडेल समुद्रात फेकले गेले होते. या बोटीला महाकाय लाटेचा तडाखा बसल्या नंतर तांडेल बंटी धनु यांनी आपल्या वायरलेस सेट वरून परिसरात मासेमारी करणाºया मच्छीमार बांधवांना मदतीची विनंती केली होती. यावेळी मिलन तरे यांनी थर्माकोल बॉक्सच्या साहाय्याने पाण्यावर तरंगत असलेल्या ११ मच्छीमाराना आपल्या बोटीत घेत त्यांचे प्राण वाचविले होते. या प्रकरणाची दखल कोस्ट गार्डने घेत त्यांचा सत्कार कोस्टगार्ड चे अधिकारी चाफेकर यांनी करून पुरस्काराची घोषणा केली होती.
५ जुलै रोजी नवी दिल्लीच्या विज्ञान भवन मध्ये श्कक ठटरअफइ च्या बैठकीत महाराष्ट्र मेरिटाईम सर्च अँड रेस्क्यू बोर्डाचे डायरेक्टर जनरल राजेंद्र सिंह यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, प्रशस्ती पत्रक देऊन त्याचा सन्मान करण्यात आला. यावेळी एसआर शिपिंगच्यावतीने तरे यांना रोख रक्कम आणि सन्मान पत्र देण्यात आले. यावेळी पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर विभागाचे कोस्ट गार्डचे अधिकारी, महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, केरळ ह्या राज्याचे मत्स्यव्यवसाय विभागाचे आयुक्त उपस्थित असल्याचे एनएफएफचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सांगितले. देशातून विशेष कार्य करणाºया विविध विभागातील अधिकाºयांचा यावेळी सन्मान करण्यात आला. त्यात मिलन तरे यांचा समावेश होता.