महिला फुलवते आहे गुलाबाची शेती

By Admin | Published: February 15, 2017 11:29 PM2017-02-15T23:29:53+5:302017-02-15T23:29:53+5:30

विक्रमगडमधील शेतकरी सध्याचा रब्बी हंगामात कमी खरचामध्ये जास्त उत्पन्न देणाऱ्या फुल शेतीकडे वळला आहे. ओंदे येथील महिला शेतकरी

The female blooms the rose farm | महिला फुलवते आहे गुलाबाची शेती

महिला फुलवते आहे गुलाबाची शेती

googlenewsNext

राहुल वाडेकर / विक्रमगड
विक्रमगडमधील शेतकरी सध्याचा रब्बी हंगामात कमी खरचामध्ये जास्त उत्पन्न देणाऱ्या फुल शेतीकडे वळला आहे. ओंदे येथील महिला शेतकरी संजीवनी माणिक घरत यांनी गुलाबाचे व सोनचाफाचे लागवड केली आहे. व्हॅलेंटाईन डे च्या काळात या फुलाना मोठी मागणी होती. मुंबईच्या दादर फुलबाजारीतील दलालांनी मोठ्याप्रमाणात ती नेल्याने शेतकऱ्यांसाठी ते नगदी पीक ठरले आहे.
पारंपारिक शेती आतबट्ट्याची ठरु लागल्याने नव्या तंत्राने फुलशेती केल्यास चांगले वार्षिक उत्पन्न मिळवता येते. हे आता विक्र मगड तालुक्यातील शेतकऱ्यांंनी जाणले आहे. म्हणूनच काय तर पारंपारिक शेतीला बगल देत तालुक्यातील शेतकरी फूल शेतीकडे वळला आहे. वसुरी, हातणे, वाकडूभागात काही शेतकऱ्यांनी गुलाब लागवड केली आहे. विक्र मगड मधील मोगरा, सोनचाफा, गुलाब, झेंडू नाशिक, दादर मार्केटला जात आहे. त्यामुळेच की काय तालुक्यात शेतीला विशेष महत्व येऊ लागल्याने महिला शेतकरी सुद्धा यात मागे नाहीत.
महिला शेतकरी संजीवनी माणिक घरत यानी मोठ्या कष्टाने सोनचाफ्याच्या पिकामध्ये आंतरपीक म्हणून गुलाबाची लागवड करत आज त्यानी आधुनिक शेती कडे वाटचाल धरली आहे.
शेती क्षेत्रातील उच्च शिक्षित असलेल्या त्याचा भाचा राहुल पाटिल तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आधुनिक शेती करणारे उदय वेलणकर याचा मार्गदर्शनाखाली घरा शेजारी असणाऱ्या एक एकर क्षेत्रावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातुंन आणलेले सोनचफाचे ३५० कलम व त्याला अंतरपीक म्हणून ४०० गुलाबाची कलमे लागवड केली. आज त्या स्वत: बागेत काम करत फुलाचे उत्पादन घेत आहेत. या लागवडीला आज २ वर्ष झाली आहेत.
या वर्षी थंडी चांगली पडल्याने दररोज गुलाबाची हजार ते पंधराशे फुले तर सोनचाफ्याची तीन ते साडेतीन हजार फुले निघतात. गुलाबाला आॅफ सिझनला शेकडा ८० ते १०० रु पये भाव मिळतो. त्याना गुलाबा पासून महिन्याला १२००० ते १५००० हजार तर सोनचाफा पासून १५००० ते २०००० हजार उत्पन्न मिळते.

Web Title: The female blooms the rose farm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.