शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा तराप्यावरून जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 04:21 AM2018-07-30T04:21:45+5:302018-07-30T04:21:54+5:30

शहरालगतच्या वैतरणा नदीवर सिद्धेश्वरी येथे पूल नसल्याने थरारक व जीवघेणा प्रवास करु न शाळा गाठण्याची कसरत वाडा तालुक्यातील विलकोस गावातील आणि आजुबाजूच्या पाड्यांमधील विद्यार्थी गेली अनेक वर्ष करत आहेत.

 Fierce travels from students' shelf for education | शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा तराप्यावरून जीवघेणा प्रवास

शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा तराप्यावरून जीवघेणा प्रवास

Next

- वसंत भोईर

वाडा : शहरालगतच्या वैतरणा नदीवर सिद्धेश्वरी येथे पूल नसल्याने थरारक व जीवघेणा प्रवास करु न शाळा गाठण्याची कसरत वाडा तालुक्यातील विलकोस गावातील आणि आजुबाजूच्या पाड्यांमधील विद्यार्थी गेली अनेक वर्ष करत आहेत. वारंवार पुलाची मागणी करूनही शासनाकडून होत असलेले हे दुर्लक्ष विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतण्याचा धोका संभवत आहे
येथील एनशेत गावाजवळून वाहणाऱ्या वैतरणा नदीच्या पलीकडे असलेल्या विलकोस या गावातील ग्रामस्थ नदीवर पुल व्हावा यासाठी २५ वर्षे संघर्ष करीत आहेत. उन्हाळयÞात ग्रामस्थ व विद्यार्थी नदीला पाणी कमी असल्याने नदीपलीकडे जावू शकतात. या ग्रामस्थांना वाडा शहराची बाजारपेठ जवळ पडत असल्याने दैनंदिन कामकाज व व्यवहारासाठी जाणे-येणे नियमतिपणे या नदीपात्रातून सुरु असते.
पावसाळयÞात मात्र या नदीच्या पात्रातील पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होत असल्याने नदीपलीकडे जाणे शक्य होत नाही. त्यांना १५ ते २० किलोमीटर अतंर वळसा घालून वाडा येथे जावे लागते. या नदीवर पूल नसल्याचा सर्वात मोठा फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. विलकोस गावातील आणि आजुबाजूच्या पाड्यांमधील सुमारे ३० ते ४० विद्यार्थी दररोज वाडा शहरातील शाळा व महाविद्यालयांमध्ये शिक्षणासाठी येत असतात. मात्र नदी पार करण्यासाठी पूल नसल्याने बांबू अथवा प्लास्टिक पाईप एकित्रत बांधून तयार केलेल्या तराप्यावरु न जीवघेणा प्रवास करण्याची वेळ त्यांच्यावर दर वर्षी येते. मात्र नदीची पातळी खोल असल्याने हा प्रवास कधीही जीवावर बेतणारा ठरू शकतो, याची कल्पना असताना शिक्षणाच्या ओढीने हे विद्यार्थी हा संघर्ष करीत आहेत. वैतरणा नादीवरील हा पूल झाला तर तालुक्याच्या पूर्वेकडील अनेक गावे तालुक्याशी जोडली जातील.

निर्णय प्रक्रियेच्या लालफितीत अडकलाय पूल
वैतरणा नदीवर ऐनशेत येथे पूल होणे ही मागणी वर्षानुवर्षाची आहे. परंतु अद्याप पूलाला चालना मिळाली नाही. तराप्याचा आधार घेवून विद्यार्थी तसेच ग्रामस्थ जीवघेणा प्रवास करत आहेत. या पूलाच्या बांधकामासाठी सुमारे चार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाली असल्याचे सा.बां. विभागाने दिली असून प्रशासकीय मंजुरीकरिता प्रस्तावित असल्याचे कनिष्ठ अभियंता प्रकाश पातकर यांनी सांगितले.
परंतु प्रशासकीय मंजुरी, तांत्रिक मंजुरी त्यानंतर निविदा प्रक्रि या यासाठी आणखी किती कालावधी जाईल हे निश्चित नसल्याने व प्रशासकीय कामकाजात होणारी दिरंगाई पाहता एकविसाव्या शतकातही आणखी किती वर्ष हा जीवधेणा संघर्ष ह्या विद्यार्थ्यांच्या वाट्याला येतोय हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Web Title:  Fierce travels from students' shelf for education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.