वसई पूर्व भागात पाचव्यांदा पूरस्थिती; तानसाने धोक्याची पातळी ओलांडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2019 11:20 PM2019-09-08T23:20:48+5:302019-09-08T23:20:53+5:30
मेढे-पांढरतारा पूल ७ वेळा पाण्याखाली
पारोळ : गणेशोत्सवात, कोसळणाऱ्या पावसामुळे तानसा नदीने धोक्याची पातळी गाठली असून पांढरतारा, मेढे पूल पाण्याखाली गेल्याने या भागातील १२ गावांचा संपर्क तुटला आहे. तानसा नदीचे पाणी या भागातील शेतांमध्ये धुसल्याने या परिसरातील शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली जाऊन पूरिस्थती निर्माण झाली तर मेढे ,पांढरतारा पूल या पावसाळ्यात ७ वेळा पाण्याखाली गेला आहे. तर या पूरामुळे गाभा धरलेल्या भात पीक पाण्याखाली गेल्याने पिकांना धोका निर्माण झाला आहे.
तानसा धरण परिसरात पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने ही तानसा नदी धोक्याची पातळी ओलांडूली तसेच रविवारी भरतीची पाणी ही तानसा नदीत उलट बाजूने आल्याने पाण्याची पातळी वाढून हे दोन पूल पाण्याखाली गेल्याने भाताणे, आडणे, नवसई, थळ्याचापाडा, मेढे, आंबोडे, वडघर, कळंभोंण, आदी १२ गावांचा संपर्क तुटला, तर शिरवली, पारोळ, शिवणसई, चांदीप, मांडवी, कोपर, खानीवडे, खारटतारा, घाटेघर, सायवन या गावांच्या पाण्याने वेढले पण रविवारी पावसाने उसंत घेतल्याने पाणी पाण्याची पातळी कमी झाल्याने झाली.
गणेशोत्सवाच्या दिवसात हे पूल पाण्याखाली गेल्याने अनेकांना गणेश दर्शनासाठी बाहेर न जाता आल्याने रविवार घरीच बसून काढावा लागला. या भाग तुंगारेश्वर अभयअरण्यलगत असल्याने अरण्यातून येणारे ओहळ तानसा नदीला मिळत असल्याने या मुळे पाण्याची पातळी वाढत असल्याने ही या परिसरात जास्त पाऊस झाल्यास पूरिस्थती निर्माण होते. असल्याचे या भागातील नागरिकांनी सांगितले.