पालघर जिल्ह्याच्या समस्या सोडविण्यासाठी संघर्ष करा! - सुभाष देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 11:30 PM2017-09-24T23:30:45+5:302017-09-24T23:32:26+5:30

पालघर जिल्हातील अनेक समस्या सोडविण्यासाठी, जिल्हयाच्या विकासासाठी संघर्ष करा, आपआपसातले वाद बाजूला ठेवून शिवसेनेला मजबूत करा कारण शिवसेना

Fight the problem of Palghar district! - Subhash Desai | पालघर जिल्ह्याच्या समस्या सोडविण्यासाठी संघर्ष करा! - सुभाष देसाई

पालघर जिल्ह्याच्या समस्या सोडविण्यासाठी संघर्ष करा! - सुभाष देसाई

Next

विक्रमगड : पालघर जिल्हातील अनेक समस्या सोडविण्यासाठी, जिल्हयाच्या विकासासाठी संघर्ष करा, आपआपसातले वाद बाजूला ठेवून शिवसेनेला मजबूत करा कारण शिवसेना ही ८० टक्के समाजसेवा व २० टक्के राजकारण करणारी संघटना असल्याचे मार्गदर्शन राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी विक्र मगड येथे आयोजित केलेल्या शिवसेना पालघर जिल्हा मेळाव्यात केले.
ते पुढे म्हणाले की शिवसेना हा एकमेव असा पक्ष आहे की ज्या पक्षांनी सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला समाजात नाव व प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम केले आहे तसेच जे शिवसेनेतून निघाले त्याची अवस्था आज काय आहे ती आपण पाहिलीच असेल.
सेनेची बांधिलकी ही जनतेशी असून यामुळेच आणि केवळ शिवसेनेमुळेच शेतकºयांची कर्जमाफी होऊ शकली आणि शिवसेनेवर जनतेचा विश्वास असल्यामुळे शिवसेनेत कार्यकर्त्यांचे इनकमिंग आहे आउटगोइंग नाही. पालघर जिल्हाचे पालकमंत्री हे आदिवासी विकास मंत्री असून सुद्धा येथील विकास अजूनही खुंटला आहे. रस्ते, पाणी, रोजगार, कुपोषण यांसारखे विषय अजूनही जैसे थे स्वरूपाचे असून या समस्या सोडवून विकासासाठी आपण सर्वांनी एकत्र राहून आगामी होणाºया नगरपालिका, ग्रामपंचायत व इतर निवडणुकीत शिवसेनेचा भगवा कसा फडकेल याचा विचार करा, शिवसेना सत्तेत सहभागी असली तरी जनतेच्या प्रश्नांवर संघर्ष करण्याबाबत ती कधीही मागे हटत नाही, असे मार्गदर्शन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
या मेळाव्यात शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना उपनेते पालघर जिल्हा संपर्कप्रमुख अनंत तरे यांच्या सह पालघर जिल्हा सह संपर्कप्रमुख केतन काका पाटील, पालघर जिल्हा प्रमुख उत्तम पिंपळे, जिल्हा प्रमुख शिरीष चव्हाण, ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुख. प्रकाश पाटील, पालघर जिल्हा महिला संघटक. ज्योती ठाकरे, आमदार. रुपेश म्हात्रे, आमदार अमित घोडा, आमदार शांताराम मोरे, पालघर जिल्हा परीषदेचे उपाध्यक्ष . निलेश गंधे, पालघर जिल्हा परीषदेचे शिवसेना गटनेते. प्रकाश निकम, यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. या मेळाव्यास शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी जिल्हा प्रमुख,तालुका प्रमुख आणि लोकप्रतिनिधी आदी मान्यवर यांच्यासह जिल्हातील शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
हा जिल्हा मेळावा यशस्वी करण्यासाठी पालघर जिल्हा परीषदेचे शिवसेना गटनेते. प्रकाश निकम, विक्रमगडचे तालुका प्रमुख राजा जाधव, शहर प्रमुख सागर आळशी, यांनी मोलाची कामगिरी बजावली.

Web Title: Fight the problem of Palghar district! - Subhash Desai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.