‘सूर्या’च्या पाण्याचा लढा राज्यपालांच्या दालनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 06:13 AM2018-04-04T06:13:25+5:302018-04-04T06:13:25+5:30
शेतकऱ्यांच्या शेती सिंचनासाठी ठेवलेले पाणी राजकीय पाठिंब्याच्या जोरावर प्रकल्पक्षेत्रा बाहेर वळविण्यात आल्याचे सूर्य पाणी बचाव संघर्ष समितीने राज्यपाल विद्यासागर राव ह्यांनी मंगळवारी राजभवनात झालेल्या बैठकी निदर्शनास आणून दिले. यातील गांभीर्य पाहता त्यांनी या संदर्भात तात्काळ बैठक घेण्याचे आदेश दिले आहेत.
- हितेन नाईक
पालघर - शेतकऱ्यांच्या शेती सिंचनासाठी ठेवलेले पाणी राजकीय पाठिंब्याच्या जोरावर प्रकल्पक्षेत्रा बाहेर वळविण्यात आल्याचे सूर्य पाणी बचाव संघर्ष समितीने राज्यपाल विद्यासागर राव ह्यांनी मंगळवारी राजभवनात झालेल्या बैठकी निदर्शनास आणून दिले. यातील गांभीर्य पाहता त्यांनी या संदर्भात तात्काळ बैठक घेण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्ह्यातील पालघर, डहाणू, विक्र मगड तालुक्यातील शेतकºयांच्या १४ हजार ६९६ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ व्हावा यासाठी उभारलेल्या सूर्या प्रकल्पाचे पाणी वसई-विरार, मीरा-भार्इंदर आणि मुंबई कडे वळविण्यात आल्याने त्यांच्या जमिनी पाण्याविना ओसाड पडत आहेत. यावेळी राजकीय गणिते खेळत आपल्या पक्षांचे निवडून आणलेल्या खासदार, आमदारांचा बिनशर्त पाठिंबा आणि पाणी वाटप धोरणाचा फायदा उचलीत सूर्या प्रकल्पांतील २२६.९३ दलघमी पाण्या पैकी १८२.८३ दलघमी पाणी वसई-विरार, मीरा-भार्इंदर आदी भागात नेण्यात आले होते.
इथले सिंचन क्षेत्र घटवुन, प्रकल्पा खाली गेलेल्या शेतकºयांना तहानलेले ठेवून स्थानिकांच्या हक्काचे पाणी राजकीय वजनाच्या जोरावर नेले जात असल्याच्या निषेधार्थ सूर्या पाणी बचाव संघर्ष समितीने पालघर मध्ये १९ मार्च पासून चार दिवस बेमुदत उपोषण सुरू ठेवले होते.
सतत चार दिवसाच्या उपोषणा नंतर उपोषण कर्त्यांची तब्येत ढासळत असताना शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी मात्र त्याची साधी दखल देखिल घेतली नसल्याने संतप्त झालेल्या हजारो शेतकरी, नागरिकांनी पोलिसांचे बॅरिकेटर्स ओलांडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सात तास घेराव घातला होता. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, आ. अमित घोडा आणि संघर्ष समितीने २४ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.
मंगळवारी सुर्या पाणी बचाव संघर्ष समितीचे प्रतिनिधी जेष्ठ पत्रकार रमाकांत पाटील, ब्रायन लोबो, जितू राऊळ यांनी राजभवनात राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालां समोर सूर्या पाण्याचा प्रश्न व त्या अनुषंगाने स्थानिकांना उध्वस्त करून हे पाणी कशा प्रकारे वळविण्यात आले आहे याची माहिती त्यांना देण्या आली. यावेळी ज्या प्रकारे वसई-विरार, भार्इंदर ला वेळोवेळी पाणी देण्यात आले आहे, त्या भूमिके बद्दल आश्चर्य व्यक्त केले. ज्या राजकीय संबंधांच्या जोरावर चुकीच्या पद्धतीने पाणी देण्यात आल्याचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आणून देण्यात आल्यानंतर त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाºयां सोबत बैठकीचे आयोजन करण्याचे आदेश सचिवांना दिले. यावेळी राज्यपाल यांचे सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी व उपसचिव रणजित कुमार हेही बैठकीस उपस्थित होते. राज्यपाल महोदय यांनी भेटीसाठी दिलेल्या वेळेप्रमाणे ही बैठक पार पडली.