चोरीची वीज पकडली म्हणून विनयभंगाचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 03:32 AM2019-04-04T03:32:18+5:302019-04-04T03:32:40+5:30
महावितरणचे कर्मचारी संतप्त : राजकीय दबाव असल्याचा आरोप
नालासोपारा : विरार पश्चिमेकडील आगाशी गावातील भाटिबंदर परिसरातील एका घरातील वीज चोरी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्याने पकडल्याचा बदला घेण्यासाठी चक्क त्या दोघांवर राजकीय दबाव टाकून अर्नाळा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल होण्याची व पोलिसांनी त्यांना अटक केल्याची घटना घडली आहे. त्याबाबत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आगाशी येथील भाटिबंदर परिसरात राहणारे संतोष थापड ह्यांचे लाईट मीटर थकबाकीमुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी काढून नेले होते त्यामुळे ते चोरीची वीज वापरत असल्याने त्यांच्यावर 28 मार्च 2019 ला सहायक अभियंता राहुल सोयाम (25) आणि विद्युत सेवक पांडुरंग चव्हाण (27) यांनी अर्नाळा पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल केला. 29 मार्चला या विभागातील महावितरणच्या कार्यालयावर संतोष थापड यांनी स्थानिक नगरसेविका आणि 30 ते 40 महिला नेऊन दमदाटी करून धमकी व शिवीगाळ केली. कार्यालयातील अधिकारी व कर्मचाºयांना अवाजवी लाईट बिले देता, ती ही वेळेवर देत नाही अशी कारणे सांगून गोंधळ घातला. तसेच अधिकाºयांनी व कर्मचाºयांनी अर्नाळा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिल्यावर संतोष थापड यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केला म्हणून पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली व वसई न्यायालयात पोलिसांनी हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
झालेल्या घटनेचा बदला घेण्यासाठी राजकीय दबाव वापरून थापड यांनी अर्नाळा पोलीस ठाण्यात राहुल आणि पांडुरंग चव्हाण यांच्या विरोधात ३१ मार्च २०१९ (रविवारी) विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दोघांना अटक करून वसई न्यायालयात सोमवारी हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी त्यांना देण्यात आली. मंगळवारी पोलीस कोठडी संपल्यावर पुन्हा न्यायालयात हजर केले असता दोघांना जामीन मिळाला. महावितरणचे जवळपास १५० ते २०० अधिकारी व कर्मचाºयांनी वसई न्यायालयाबाहेर गर्दी केली होती.
पोलिसांनी स्थानिक नगरसेविकेच्या राजकीय दबावाखाली खोटा गुन्हा दाखल केला असून आमच्या अधिकारी व कर्मचाºयांचे खच्चीकरण करण्याचा प्रकार झाला आहे. अर्नाळा पोलिसांनी दोघांना मागच्या गुन्ह्याबाबत काम असल्याचे खोटे बोलून त्यांना बोलावून अटक केले आहे. लवकरच आमच्या सर्कल असोसिएशनची मिटिंग घेऊन न्याय मागण्यांसाठी कामबंद आंदोलन करण्यासाठी दिशा ठरवली जाईल.
- लक्ष्मण राठोड, सहसचिव, सबॉर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशन
या प्रकरणात पोलिसांनी कोणतीही चौकशी न करता तातडीने गुन्हा दाखल करून इतक्या लवकर अटक कशी काय केली ? यात काही राजकीय दबाव आहे की काही आर्थिक व्यवहार ?
- अनवर मिर्जा, कार्यकारी
अभियंता, विरार विभाग
या गुन्ह्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गायकवाड यांनी संपूर्ण चौकशी करूनच पुढील कारवाई केलेली आहे. आमच्याकडे तक्र ार देण्यास कोणीही आले की तक्र ार घेऊनच त्याची रितसर चौकशी करून कारवाई केली जाते.
- अप्पासाहेब लेंगरे, पोलीस निरीक्षक, सागरी पोलीस ठाणे, अर्नाळा