सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील सर्व रिक्त पदे भरू

By admin | Published: August 6, 2015 11:26 PM2015-08-06T23:26:20+5:302015-08-06T23:26:20+5:30

पालघर जिल्ह्णातील आदिवासींचा विकास घडवितांना प्रशासनाला अनेक अडचणी, समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे मान्य करून येत्या सप्टेंबर

Fill all the vacant posts in the district till September | सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील सर्व रिक्त पदे भरू

सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील सर्व रिक्त पदे भरू

Next

पालघर : पालघर जिल्ह्णातील आदिवासींचा विकास घडवितांना प्रशासनाला अनेक अडचणी, समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे मान्य करून येत्या सप्टेंबर पर्यंत सर्व कार्यालयातील रिक्तपदे भरली जातील, असे आश्वासन आदिवासी विकास व पालकमंत्री विष्णू सवरा यांनी पालघर जिल्ह्णाच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्ताने जनतेला दिले.
महसूल दिनाचे औचित्य साधून गुरुवारी पालघर जिल्हा प्रशासकीय विस्तारीत इमारतीचे उद्घाटन आज पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते पार पडले.
पालघर जिल्हा सागरी, नागरी, डोंगरी अशा भागात विभागला गेला असताना जिल्ह्णाला १२० कि. मी. चा प्रशस्त व सुंदर समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे केळवा, शिरगाव, डहाणू, बोर्डी इ. गावातील पर्यटनाचा विचार करतांना जव्हार, सारख्या थंड हवेच्या पर्यटनस्थळाच्या विकासासाठी विकास आराखडा तयार करण्यात आल्याचे पालकमंत्री सवरा यांनी सांगितले. पालघर जिल्ह्णात भिषण पाणीटंचाईची समस्या अनेक वर्षापासून भेडसावत असल्याने जलयुक्त शिवार योजनेंतर्गत दोन हजार शेततळी व पाचशे वनतळी बांधण्याचा संकल्प राज्यशासनाने केल्याचेही त्यांनी सांगितले. यामुळे आदिवासी बांधवाना त्यांच्या गावातच रोजगार निर्माण झाल्यास स्थलांतरासारखा महत्वाचा प्रश्न निकाली निघेल असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केली.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर, अडचणीवर मात करून तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणाांनी पालघर जिल्ह्णाची घोषणा केली. त्यानंतर जिल्हाधिकारी म्हणून जिल्ह्णाचा डोलारा यशस्वीपणे सांभाळण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी अभिजीत बांगरांनी आपल्या टीमसह चालविलेले काम अत्यंत कौतुकास्पद असल्याचे मत माजी राज्यमंत्री राजेंद्र गावितांनी व्यक्त केले तर आदिवासींचा सर्वकष विकास डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्णाची निर्मिती करण्यात आल्यानंतर अनेक विभागातील रिक्तपदामुळे ठाणे जिल्ह्णाचा कारभार बरा होता असे नागरीक उघडपणे बोलू लागले आहेत. त्यामुळे पालकमंत्री सवरा यांनी याबाबत खंबीर भूमिका घ्यावी त्यासाठी आमचा पूर्ण पाठींबा राहील असे आमदार विलास तरे यांनी सांगितले.
कार्यक्रमात महसूल विभागातील कोतवालापासून ते उपजिल्हाधिकारी पर्यंतच्या अधिकाऱ्यांनी विशेष कार्य केलेल्या अप्पर जिल्हाधिकारी किशोर तावडे, प्रांताधिकारी शिवाजीराव दावभट,नायब तहसिलदार सचीन चौधरी, शिपाई दिनेश कोल्हेकर व कृष्णकांत गडग यांचा सत्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला.
यावेळी माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित, आ. विलास तरे, आ. शांताराम मोरे, जि. प. अध्यक्षा सुरेखा थेतले, जिल्हाधिकारी अभिजीत बांगर, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप शिंदे, पोलीस अधीक्षिका, शारदा राऊत, सभापती अशोक वडे, विनीता कोरे इ. मान्यवर उपस्थित होते. मात्र या सोहळ्याबाबत जनतेत फारसा उत्साह दिसून येत नव्हता. त्या पावसाच्या सावटाची भर होती.

Web Title: Fill all the vacant posts in the district till September

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.