भराव माफियांनी डोके काढले वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 05:36 AM2018-12-17T05:36:59+5:302018-12-17T05:37:18+5:30
संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष : पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात होत आहे ऱ्हास
मीरा रोड : मातीचा बेकायदा भराव रोखण्यात पालिकेला अपयश आले असताना आता पावसाळा संपल्यानंतर मीरा भार्इंदर मध्ये मातीचा भराव करणाऱ्या माफियांनी डोके वर काढले असून शहरात मोठ्या प्रमाणात बेकायदा मातीचा भराव सुरू झाला आहे. मुंबईतून येणाºया दगड-मातीचे प्रमाण मोठे आहे. नैसर्गिक नाल्यांसह सर्वात जास्त फटका नाविकास क्षेत्र, सीआरझेड , कांदळवन व पाणथळ भागाला बसत असल्याने पर्यावरणाचा मोठा ºहास होत आहे. तर सर्रास चालणाºया या बेकायदा भरावांकडे महापालिका, महसूल व पोलिसांसह लोकप्रतिनिधी डोळेझाक करत
आहे.
मीरा- भार्इंदरमध्ये पूर्वी भरावासाठी महापालिकेच्या संगनतमाने कचºयाचा उपयोग करून घेण्यात येत होता. पण पालिका अधिकारी व कंत्राटदारांवर गुन्हे दाखल झाल्याने कचरा टाकणे बंद झाले. दरम्यान मीरा- भार्इंदरमधून बांधकाम प्रकल्प, नालेसफाई, भूमिगत गटारासह शहरात होणारे बांधकाम डेबिजचा वापर भरावासाठी केला जाऊ लागला. मुंबईतून विविध बांधकाम प्रकल्पातून दगड-माती निघू लागल्याने मीरा भार्इंदर व वसई विरार तर मुंबईतील माती टाकण्याची डम्पिंग ग्राऊंड झाली आहेत.
आधी भराव करण्यासाठी खूप खर्च येत असे. पण आता मात्र भराव टाकण्यासाठी पैसे मिळू लागल्याने नागरिकांना फुकटचा भराव करून मिळतो. यामुळे माती माफिया बोकाळले आहेत. दिवस - रात्र शहरात लहान मोठी वाहने डेबिज, माती वाहून नेत सर्रास फिरत असताना त्यांना महापालिका, पोलीस वा महसूल विभागापैकी कोणी अडवताना दिसत नाहीत. संबंधित सरकारी यंत्रणा केवळ एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकण्याचे काम करत आहेत. पालिकेची माती भराव नियंत्रण पथकेही निव्वळ दिखाऊ ठरली आहेत.
बेकायदा भराव खाजगी व सरकारी जमिनीतही केला जात असून भूखंड तयार करण्यापासून झोपड्या, चाळी, तबेले , गोदाम आदी विविध बांधकामे उभी राहत आहेत. बेकायदा भरावामुळे शहरात पूरस्थिती निर्माण होत असतानाही यंत्राणा दुर्लक्ष करत आहेत.
चेणे, काजूपाडा, वरसावे, घोडबंदर, माशाचा पाडा व परिसरात मोठ्या प्रमाणात भराव केला जात आहे. नैसर्गिक चेणे नदी व ओढ्यांमध्ये भराव करून प्रवाहाचे मार्ग अरुंद केले आहेत.
मीरा रोडच्या कनकिया, हाटकेश, इंद्रलोक तर भार्इंदरच्या नवघर, आरएनपी पार्कपर्यंत तसेच पश्चिमेला रेल्वे मार्गापासून राधास्वामी सत्संग ते थेट मुर्धा, राई, मोर्वा , डोंगरी, उत्तनपर्यंत व पालिका मुख्यालया मागील परिसरात डेब्रिज, दगड-माती भराव करणाºया माफियांनी डोके वर काढले आहे. यामुळे पुन्हा यंत्रणांना कारवाई कराव लागणार आहे.
मातीचा भराव नियंत्रण पथकासह अधिकाºयांनाही कारवाईचे निर्देश दिले आहेत. वाहने जप्त करून गुन्हे दाखल करण्यास सांगितले आहे. बेकायदा भराव चालू देणार नाही. पोलीस व महसुल विभागाशी समन्वय ठेऊन कारवाई करु.
- बालाजी खतगावकर, आयुक्त
नियमांचे उल्लंघन करून माती - डेबिजचा भराव करणाºया वाहनांवर कारवाईसाठी पोलीस आवश्यक खबरदारी घेतील. तक्रार आल्यास निश्चितच कारवाई केली जाईल.
- शांताराम वळवी,
उपअधीक्षक, मीरा रोड
मातीभराव माफियांना शहरातील लोकप्रतिनिधी व प्रशासनासह विकासक, भूमफियांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे खुले आम भराव करणारी वाहने फिरत असताना त्यावर कारवाई होत नाही. - अनु पाटील,
महिला संघटक, मनसे