अखेर सूर्या कॉलनीतील अंधार सरला , चार महिन्यांच्या प्रतिक्षे नंतर झाला लखलखाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 12:41 AM2017-09-01T00:41:37+5:302017-09-01T00:41:59+5:30

सूर्या प्रकल्पांतर्गत कासा जवळील सूर्यानगर वसाहतीचे २ कोटी ७३ लाख ५९ हजार ३४० रक्कमेची विलंब आकाराची थकबाकी झाल्याने महावितरणाने ३ मे पासून वीजपुरवठा खंडीत केला होता.

Finally, after the four-month waiting period, the darkness of Surya colony ended in Lakhkhakhat | अखेर सूर्या कॉलनीतील अंधार सरला , चार महिन्यांच्या प्रतिक्षे नंतर झाला लखलखाट

अखेर सूर्या कॉलनीतील अंधार सरला , चार महिन्यांच्या प्रतिक्षे नंतर झाला लखलखाट

Next

कासा : सूर्या प्रकल्पांतर्गत कासा जवळील सूर्यानगर वसाहतीचे २ कोटी ७३ लाख ५९ हजार ३४० रक्कमेची विलंब आकाराची थकबाकी झाल्याने महावितरणाने ३ मे पासून वीजपुरवठा खंडीत केला होता. त्यामुळे सूर्या कॉलनीतील कर्मचाºयांना व रहिवाशांना तब्बल ४ महिने अंधारात राहवे लागत होते.
यानंतर पालघर विधानसभेचे आमदार अमित घोडा यांनी पूढाकार घेत बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याशी चर्चा केल्यानंतर या विषयी जल संपदा राज्यमंत्र्यांच्या दालनात झालेल्या संबंधित अधिकाºयांच्या बैठकीत वीजबील भरण्याचे आदेश देण्यात आले.
त्यानंतर कोकण पाटबंधारे विभागाने प्रलंबित विलंब आकारणीचा २ कोटी ७३ लाख ५९ हजार ३४० रक्कमेचा धानादेश महावितरणला दिला. त्यानंतर त्वरीत वीजपूरवठा सुरू करण्यात आला. यावेळी बैठकीत आमदार अमित घोडा, कोकण पाटबंधारे अभियंता अन्सारी, सूर्या कार्यकारी अभियंता निलेश दुसाने, सचिन शिरसाट, निवास वरठा आदि उपस्थित होते. चार महिन्यांच्या बहुप्रतिक्षेनंतर कॉलनीमध्ये वीज आल्याने अक्षरश: जल्लोष करण्यात आला.

Web Title: Finally, after the four-month waiting period, the darkness of Surya colony ended in Lakhkhakhat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.