अखेर तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर वसई विरार महापालिका आरोग्य विभागाला मिळाले लसीचे 2600 डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 08:08 PM2021-07-19T20:08:35+5:302021-07-19T20:08:47+5:30

Corona Vaccination Vasai Virar: 2500 कोव्हीशिल्ड व 100 कोव्हेक्सीन चे उद्या वाटप; फक्त दुसऱ्या डोस साठीच टोचली जाणार लस

Finally, after three days Vasai Virar Municipal Health Department got 2600 doses of corona vaccine | अखेर तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर वसई विरार महापालिका आरोग्य विभागाला मिळाले लसीचे 2600 डोस

अखेर तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर वसई विरार महापालिका आरोग्य विभागाला मिळाले लसीचे 2600 डोस

Next

आशिष राणे वसई

लोकमत न्यूज नेटवर्क 

वसई :- मागील आठवड्यात बऱ्यापैकी लसीकरण झाले नाही किंबहुना शासनाकडूनच पुरवठा होत नसल्याने अत्यंत कमी पुरवठा होऊन वसई विरार महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे लसीकरण मोहीम राबवत असून मागील तीन दिवसांच्या विश्रांती नंतर वसई विरार महापालिका आरोग्य विभागाला आता मंगळवार दि 20 जुलै साठी लाभार्थ्यांच्या दुसऱ्या डोससाठी एकूण  2600 लसीचे डोस प्राप्त झाले असल्याचे जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी लोकमत ला सांगितले

दरम्यान महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या या लसी मध्ये सर्व लसी या 18 वर्षे पुढे व परदेशी नागरीक यांच्यासाठी दिल्या जाणार आहेत यात 2500 कोव्हीशिल्ड व 100 कोव्हेक्सीन डोस उपलब्ध झाले आहेत

अधिक माहिती नुसार,शासनाने दिलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार वसई विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात covid-19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे दि.19 जुलै रोजी शासनाकडून महानगरपालिकेला 2 हजार 500 कोव्हीशिल्ड व 500 कोव्हेक्सीन लसी प्राप्त झाल्या आहेत

 त्यानुसार दि. 20 जुलै 2021 रोजी महानगरपालिका कार्यक्षेत्रातील तक्त्यात नमूद म्हणून  नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात अंतर्गत 18 वर्षावरील लाभार्थ्यांचे 50 टक्के ऑनलाइन व 50 टक्के ऑनसाईड नोंदणी द्वारे वसई विरार महानगरपालिका हद्दीतील एकूण 15 लसीकरण केंद्रावर हे covid-19 प्रतिबंधक लसीचे नियोजन करण्यात आले आहे 

खालील प्रमाणे केवळ 18 वर्षे वरील व परदेशी नागरीक यांच्या दुसऱ्या डोसचे वाटप  केले जाणार आहे

 

नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र  कोव्हीशिल्ड

बोळिंज 100

 निदान 100

 रानाळे तलाव 100

 नारंगी 100 

 चंदनसार 100

 पाटणकर पार्क 100

उमराळे 100

 धानीव 100

 मोरेगाव 100

झालवड 100

 नवघर 100

 दिवाणमान 100

 जुचंद्र 100

तुलिंज 400

सर डी एम पेटिट 400

अगरवाल सिविसी 300 

अशा एकूण 15 सेंटर वर 2 हजार 400 लसी टोचल्या जाणार आहेत

 

वसई पूर्व येथे परदेशी नागरिकांना देण्यात येणार 200 लसीचे डोस 

 वालीव अगरवाल सीव्हीसी मध्ये केवळ परदेशी नागरिकांना दुसरा डोस म्हणून लसीकरण केल जाणार आहे यात कोव्हीशिल्ड 100 व को व्हेक्सीन 100 अशी एकूण 200 डोस दिले जाणार आहेत

Web Title: Finally, after three days Vasai Virar Municipal Health Department got 2600 doses of corona vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.