अखेर लोकशक्ती एक्स्प्रेसला उंबरगाव स्थानकात थांबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 11:25 PM2019-02-23T23:25:03+5:302019-02-23T23:25:08+5:30
सीमा भागात प्रवाशांचा जल्लोष : रहिवाशांकडून होणार स्वागत सोहळा ; पालघर, गुजरात, राजस्थानच्या खासदारांचे प्रयत्न फळाला
- अनिरुद्ध पाटील
डहाणू : पश्चिम रेल्वेच्या उंबरगाव रेल्वे स्थानकात रविवार, २४ फेब्रुवारीपासून लोकशक्ती एक्स्प्रेसला एका मिनिटाचा थांबा पुढील सहा महीने प्रयोगिक तत्वावर दिला जाणार आहे. हे स्थानक महाराष्ट्र गुजरात या सीमा भागात असून या सुविधेमुळे प्रवाशी समाधानी असून एका कार्यक्र माच्या आयोजनातून हा आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे.
पश्चिम रेल्वेच्या बांद्रा टर्मिनल्स ते अहमदाबाद दरम्यान लोकशक्ती एक्स्प्रेस धावते. ही क्र मांक २२९२७ ची गाडी बांद्रा येथून सुटल्यानंतर विविध स्टेशन घेत डहाणू रोड स्थानकात रात्री दहाच्या सुमाराला पोहाचते. त्यानंतर थेट वापी स्थानकात थांबात होती. मात्र रविवार, २४ फेब्रुवारीपासून १०:१६ वाजता उंबरगाव स्थानकात पोहचल्यानंतर एक मिनिटभर थांबून पुढे जाणार आहे. तर क्र मांक २२९२८ ही अहमदाबाद स्थानकाहून सुटल्यानंतर पहाटे ३:२३ वाजता या स्थानकात पोहचल्यावर मिनिटभर थांबणार आहे. मागील एका दशकांपेक्षा अधिक काळापासून या गाडीला थांबा मिळावा म्हणून स्थानिकांनी लिखित सामूहिक निवेदनं रेल्वे प्रशासनाला दिली आहेत.
हे स्थानक दोन्ही राज्यांच्या सीमेवर आहे. उंबरगाव हे औद्योगिक शहर असून मुंबई आणि उपनगरहून अनेक कामगार येथे येतात. शिवाय येथे समुद्र किनाऱ्यालगत वृंदावण स्टुडिओ असून पौराणकि चित्रपट व मालिकांकरीता बॉलीवूड मध्ये प्रसिद्ध आहे.
रात्री व पहाटेच्या शूटिंगकरिता बाहेरून येणाºया कलाकार-तंत्रज्ञांना त्याचा फायदा होणार आहे. तर सर्वाधिक फायदा तलासरी तालुक्यातील आदिवासी बांधवांना होणार आहे. कारण डहाणू रोड रेल्वे स्थानकापेक्षा हे जवळचे व सोयीचे आहे. रात्री ९:२० च्या सुमारास मुंबईहून येणारी बलसाड फास्ट पॅसेंजर येथे थांबते.
त्यानंतर रात्री अडीचच्या सुमारास विरमगाम पॅसेंजर थांबते. त्यामुळे डहाणू रोड स्थानकापर्यंत उपनगरीय सेवा असली तरी तलासरीतील नागरिकांना त्याचा म्हणावा तसा उपयोग होत नाही. त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात सुशिक्षित आदिवासी बांधव मुंबईकडे नोकरीकरिता जाऊन रात्री घरी पोहचू शकतात. नोकरीकरीता होणारे आदिवासींचे स्थलांतर थांबण्यास त्याचा हातभार लागू शकतो.
दरम्यान, स्थानिकांप्रमाणेच उंबरगाव इंडस्ट्रियल असोसिएशनचे गिरीश राव, साहिर व्होरा, प्रशांत कारु ळकर यांनी रेल्वे मंत्रालयाला लिखित निवेदने दिली.
सामूहिक प्रयत्नांना यश, रोजगारांचा प्रश्न मार्गी
गुजरातचे खासदार डॉ. के. सी. पटेल, राजस्थानचे खासदार देवजी पटेल, मंत्री रमण पाटकर, पालघर खासदार राजेंद्र गावीत, आमदार पास्कल धणारे यांनी प्रयत्न केले. या सामूहिक प्रयत्नांचे हे फलित असल्याची स्थानिकांची भावना आहे.
याचा स्थानिकांना लाभ होणार असून अनेक शिक्षित तरु ण नोकरी करिता बाहेर पडतील असे अनिलकुमार पांडे म्हणाले तर उंबरगाव इंडस्ट्रियल असोसिएशनच्या माध्यमातून या बाबत रेल्वे मंत्रालयाला निवेदनं देण्यात आल्याचे प्रशांत कारूळकर म्हणाले.