कोरोना रुग्णांची आर्थिक लूट थांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 12:07 AM2021-04-22T00:07:16+5:302021-04-22T00:07:26+5:30

शासकीय दरानेच उपचार करा : खाजगी रुग्णालयांना जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

The financial robbery of Corona patients will stop | कोरोना रुग्णांची आर्थिक लूट थांबणार

कोरोना रुग्णांची आर्थिक लूट थांबणार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
पालघर : जिल्ह्यातील आठ खाजगी रुग्णालयांतून कोरोना उपचार देणाऱ्या रुग्णांची आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी निदर्शनास आल्यानंतर पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी अशा पिळवणुकीच्या प्रकारांवर आळा बसावा, यासाठी कारवाईचे आदेश पारित केले आहेत.


पालघर जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने कोरोना उपचारासाठी जिल्ह्यातील शासकीय रुग्णालय 
सेवा अपुरी पडू लागली आहे. आरोग्य सेवेत असलेली रिक्त पदे भरण्याचे काम अजून कोणत्याही लोकप्रतिनिधींना जिल्हा निर्मितीनंतर आजतागायत जमलेले नाही. त्यामुळे जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था खिळखिळी झाली आहे. याचा प्रत्यय कोरोनाकाळात अनेक नागरिकांना 
येत आहे. 


बोईसर टिमा हॉस्पिटल, पालघर ग्रामीण रुग्णालय, रिव्हेरा विक्रमगड रुग्णालय आदी रुग्णालयांत अनेक रिक्त पदे असतानाही तेथील डॉक्टर, सिस्टर आदी आरोग्य सेवेतील लोकांनी कोरोनाकाळात रुग्णांना उत्तम सेवा पुरवत हजारोंचे प्राण वाचविण्याचे कसब साधले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जवळपास नियुक्त कर्मचाऱ्यांची तशीच परिस्थिती असताना आरोग्य सेवा ढेपाळल्याने सध्या रुग्णांना बेड मिळण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.


शासकीय नियमानुसार रुग्णांकडून बिलाची आकारणी करावी तसेच आकारणी करत असलेल्या विलंबाबाबत रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना पूर्वकल्पना देणे अपेक्षित असल्याचे सांगून रुग्णालयामार्फत आकारणी करत असलेल्या शुल्काचे फलक रुग्णालयाच्या दर्शनी भागात रुग्णांच्या माहितीकरिता लावणे आवश्यक असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी या रुग्णालयांच्या संचालकांना लेखी कळवले आहे. 


खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना आकारण्यात येणाऱ्या बिलांची फेरतपासणी होणार असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. यासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती या रुग्णालयातील अवास्तव बिलांची तपासणी करणार आहे. 
सर्व बाबी शासकीय नियमानुसार खाजगी रुग्णालयांनी अमलात आणायच्या आहेत. त्या अमलात न आणल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील, असे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

दर निश्चित, तरीही खाजगी रुग्णालयांकडून लूट 
nकोरोना रुग्णांवर उपचारासाठी परवानगी दिली असली, तरी या खाजगी रुग्णालयांमधून गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असताना शासनाने रुग्ण उपचारांच्या दरांची नियमावली बनवताना दरनिश्चिती जाहीर केली आहे. परंतु, शासनाने जाहीर केलेल्या दरापेक्षा अवास्तव दराने रुग्णांची लूट केली जात असल्याच्या तक्रारी जिल्हा 
प्रशासनाकडे येऊ लागल्या होत्या. 
nबोईसरमधील एका खाजगी रुग्णालयाने लाखो रुपयांचे 
बिल कोरोना रुग्णाच्या माथी 
मारल्याबाबतचा मुद्दा अलीकडेच प्रसारमाध्यमांनी उचलून धरला होता. ही बाब लक्षात येताच जिल्हाधिकारी डाॅ. माणिक गुरसळ  यांनी नागरिकांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबविण्यासाठी पालघर आणि बोईसरमधील 
८ खाजगी रुग्णालयांना नोटीस बजावली आहे. 

Web Title: The financial robbery of Corona patients will stop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.