‘त्या’ सुरक्षा रक्षकाचा सांगडा सापडला ?

By admin | Published: January 20, 2016 01:47 AM2016-01-20T01:47:16+5:302016-01-20T01:47:16+5:30

सातीवली येथील एका गटारात आणि कचऱ्याच्या ढिगारात सापडलेला मानवी सांगाडा आणि हाडे सोळा महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका सुरक्षा रक्षकाची असल्याचा प्राथमिक अंदाज आहे

Find that 'safe guard shield'? | ‘त्या’ सुरक्षा रक्षकाचा सांगडा सापडला ?

‘त्या’ सुरक्षा रक्षकाचा सांगडा सापडला ?

Next

वसई : सातीवली येथील एका गटारात आणि कचऱ्याच्या ढिगारात सापडलेला मानवी सांगाडा आणि हाडे सोळा महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका सुरक्षा रक्षकाची असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी कुटुंबियांनी सुरक्षा रक्षकाची ओळख पटवली असली तरी डीएनए चाचणीनंतरच ठोस निर्णय घेतला जाईल असे वालीव पोलिसांचे म्हणणे आहे.
वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सातीवली औद्योगिक वसाहतीतील एक गटार आणि कचऱ्याच्या ढिगाची साफसफाई सुरु असताना त्याठिकाणी काही हाडे आणि मानवी सांगडा आढळल्यानंतर या परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सांगड्याचा पंचनामा करून पुढील तपासासाठी जे. जे. हॉस्पीटलमध्ये पाठवला आहे. गटाराला लागून असलेल्या सनराईज कंपनीत कामाला असलेला मराठा सिक्युरिटीजचा सुरक्षा रक्षक रविंंद्र सिंंग हा २२ आॅगस्ट २०१४ पासून बेपत्ता आहे. हाडे आणि सांगड्यावरील खुणांवरून सिंग यांची पत्नी किरण सिंग आणि त्यांच्या नातेवाईकांनी हा सांगडा रविंद्रचा असल्याची ओळख पटवली आहे. सांगाड्याच्या एका हातात कडे आणि सांगाड्यावर सिक्युरिटी कंपनीचा गणवेशाचे अवशेष सापडून आल्याने नातेवाईकांनी रविंंद्रची ओळख पटवली आहे. (वार्ताहर)

Web Title: Find that 'safe guard shield'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.