एडवण किनाऱ्यावर भीषण आग, नागरी वस्ती बचावली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 02:15 AM2018-09-28T02:15:26+5:302018-09-28T02:15:38+5:30
पालघर जिल्ह्यातील समुद्र किनाºयावर साठलेल्या तेल मिश्रित डांबर गोळ्यांनी स्वच्छ आणि सुंदर किनारे विद्रुप केले जात असतांना सोमवारी एडवणच्या किना-यावर साचलेले डांबर गोळे अचानक पेटल्याने लागलेल्या आगीने क्षणार्धात रौद्ररुप धारण केले.
- हितेन नाईक
पालघर - जिल्ह्यातील समुद्र किनाºयावर साठलेल्या तेल मिश्रित डांबर गोळ्यांनी स्वच्छ आणि सुंदर किनारे विद्रुप केले जात असतांना सोमवारी एडवणच्या किना-यावर साचलेले डांबर गोळे अचानक पेटल्याने लागलेल्या आगीने क्षणार्धात रौद्ररुप धारण केले. किनारपट्टीवरील बागायती क्षेत्राला याची मोठी झळ पोहचण्याचा धोका निर्माण झाल्याने ग्रामस्थांसह अग्निशमन जवानांनी या आगीवर नियंत्रण मिळविल्याने आसपासची घरे मात्र थोडक्यात बचावली.
जिल्ह्याच्या १०७ किमीची किनारपट्टी अनेक खाड्या, खाजणे, नाले औद्योगिक वसाहती मधून कोणतीही प्रक्रि या न करता सोडण्यात येणाºया प्रदूषित पाण्यामुळे काळवंडली आहे. त्यामुळे अनेक गावपाडे विविध प्रदूषणाने ग्रासले आहेत. कॅन्सर, त्वचा रोग, श्वसनाच्या विविध विकारांनी लोक मृत्युमुखी पडू लागले आहेत. जहाजे आपले टाकाऊ तेल व उत्सर्जके समुद्रात टाकत असल्याने समुद्राच्या पृष्ठभागावर तवंग दिसण्यात सध्या वाढ होऊ लागली आहे. मागच्या काही वर्षभरात सुमारे १० हजार तेल वाहतूक करणार्या जहाजाना जलसमाधी मिळाल्याने हा साठा मासेमारीला मारक ठरतो आहे.
ओएनजीसी कंपनी कडून समुद्रात तेल,खिनज द्रव्याच्या शोधार्थ महाकाय बोटी द्वारे प्रत्येक वर्षात केल्या जाणाºया उत्खननामुळे आणि तेल काढण्याच्या प्रक्रियेदरम्यान समुद्रात पडणाº्या तेला मुळे समुद्रात ही काही भागात तवंग दिसू लागले आहेत. तेल उत्खननादरम्यान आणि त्यांच्या फ्लॅटफॉर्म वरून पडणारे तेल भरतीच्या वेळी किनार्यालगत येते आहे तर सध्या जिल्ह्यातील सर्वच किनार्यावर डांबर गोळ्यांचा प्रदूषित कचरा मोठ्या प्रमाणात जमल्याचे दिसत असून सोमवारी दुपारी एडवण, कोरे ह्या गावसमोरील किनार्यावर जमलेल्या डांबर गोळ्यांनी अचानक पेट घेतला होता. २५ ते ३० फुटांच्या ज्वाला उसळल्याने उपसरपंच सचिन वर्तक ह्यांनी आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे अधिकारी कदम यांना त्याची माहिती देऊन मदत मागितली.पालघर नगरपरिषदेच्या अग्निशमन सेवेचा बंब पोचण्या आधीच उपसरपंच वर्तक , दिपेश ठाकुर, प्रभाकर ठाकूर , उसरणी सरपंच हरेंद्र पाटील,विकास राऊत , ग्रामविकास अधिकारी तुरबाडकर, विकास वर्तक व कुलदीप वर्तक व इतरांनी किनार्यावरील माती आणि पाण्याच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न सुरू ठेवला होता. त्यामुळे ती नियंत्रणात आली.
निर्मल सागर तट अभियान बारगळले?
निर्मल सागर तट अभियाना अंतर्गत झाई, बोर्डी, घोलवड, चिखले, नरपड, चिंचणी, सातपाटी, शिरगाव, एडवन, माहीम, केळवे, अर्नाळा, कळंब, रानगाव ह्या ग्रामपंचायतींना २०पासून ते १४लाखाचा निधी देणार होते.
मात्र एडवण सह अनेक ग्राम पंचायतींना ५ ते ६ लाखाच्या वर पैसेच मिळाले नाही. ते मिळाले असते तर आम्ही स्वच्छता ठेवली असती व हा प्रसंग घडला नसता असे सरपंच अरु णा तरे ह्यानी लोकमतला सांगितले.