कार अपघातात फायरमनचा मृत्यू
By admin | Published: November 14, 2015 01:56 AM2015-11-14T01:56:40+5:302015-11-14T01:56:40+5:30
भिवंडी तमालुक्यातील गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दितील मौजे म्हाळुंगे गावा शेजारील सैतानी नदीच्या पुलाजवळ कार व दुचाकी अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली.
अंबाडी : भिवंडी तमालुक्यातील गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दितील मौजे म्हाळुंगे गावा शेजारील सैतानी नदीच्या पुलाजवळ कार व दुचाकी अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली.
मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव योगेश भास्कर पाटील (२७) रा. वारेट असे असून तो वसई विरार महानगरपालिकेच्या फायरब्रिगेड विभागामध्ये फायरमेन या पदावर काम करीत होता. आपले कर्तव्य बजावून दिवाळी पाडवा साजरा करण्यासाठी दुचाकीवरुन तो घरी येत असताना सैतानी पुजाजवळ क्वॉलीस कारच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने तिने त्यास धडक दिली. त्यामध्ये दुचाकीस्वार योगेश हा जबर जखमी झाल्याने त्यास पोलीस नाईक, एम.एन.चासकर व जे.सी.पवार तसेच नागरिकांच्या मदतीने अंबाडी नाका येथील नवजीवन हॉस्पिटलमध्ये दवा उपचार करण्यासाठी दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्यास मृत झाल्याचे घोषित केले.
या संदर्भात कारचालक आकाश मदन कोळी (रा. भिवंडी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. ऐन दिवाळी पाडव्याच्या दिवशी ही दु:खद घटना घडल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. (वार्ताहर)