दुर्दैवी! नालासोपारा विरार लिंक रोडवर निष्पाप बालकाचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 07:47 PM2023-01-06T19:47:56+5:302023-01-06T19:50:15+5:30

मंगेश कराळे लोकमत न्यूज नेटवर्क,  नालासोपारा : १० ते १२ दिवसांपूर्वी नव्याने सुरू झालेल्या नालासोपारा विरार लिंक रोडवर बुधवारी ...

First casualty of an innocent child on Nalasopara Virar Link Road | दुर्दैवी! नालासोपारा विरार लिंक रोडवर निष्पाप बालकाचा बळी

दुर्दैवी! नालासोपारा विरार लिंक रोडवर निष्पाप बालकाचा बळी

Next

मंगेश कराळे

लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा: १० ते १२ दिवसांपूर्वी नव्याने सुरू झालेल्या नालासोपारा विरार लिंक रोडवर बुधवारी रात्री झालेल्या अपघातात एका ८ वर्षीय निष्पाप बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, ८ वर्षीय मुलगा बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास वडील विक्रम भारती यांच्यासोबत उभा असताना ओव्हरस्पीडने भरधाव वेगाने येणाऱ्या एका बुलेटस्वार दुचाकीस्वाराने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मुलाला धडक दिल्याने हा निष्पाप मुलगा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी अनेक हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले मात्र मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याने आणि कुटुंब गरीब असल्याने डॉक्टरांनी मुलाला दाखल करण्यास नकार दिला.

कुटुंबीयांनी मुलाला आईसीस हॉस्पिटलमध्ये नेले जेथे डॉ. महाबली सिंह यांनी पैश्याची पर्वा न करता मुलाला दाखल करण्यास सुरुवात केली. मात्र दुर्दैवाने शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास उपचारादरम्यान या बालकाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. कपिल भारती असे मृत मुलाचे नाव असून तो फक्त ८ वर्षांचा होता. नालासोपारा पोलिसांनी आरोपीची दुचाकी जप्त केली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांनी लोकमतला सांगितले. 

या रस्त्यावर दुभाजक, स्पीड ब्रेकर आणि पथदिवे नसल्यामुळे अंधाराचा फायदा घेत काही तरुण भरधाव वेगाने ये-जा करताना दिसतात. तर बिनदिक्कत या रस्त्यावर स्टंटबाजी करताना दिसतात. पालिकेने दुभाजकाचे काम सुरू केले असून रस्ता बंद करून दुभाजक, स्पीडब्रेकर आणि पथदिवे लावूनच रस्ता पुन्हा खुला करण्यात येणार असल्याचे मनपा अधिकाऱ्यांनी लोकमतला सांगितले.

Web Title: First casualty of an innocent child on Nalasopara Virar Link Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.