शरीरशौष्ठव स्पर्धेत प्रथम क्र मांक लकी मिश्रा याने पटकावला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 04:19 AM2018-12-28T04:19:26+5:302018-12-28T04:19:47+5:30

युवकयुवतींना क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी भाजपाने राज्यभर सीएम चषक स्पर्धा घेतली.

First Olympic medalist Lucky Mishra won the title | शरीरशौष्ठव स्पर्धेत प्रथम क्र मांक लकी मिश्रा याने पटकावला

शरीरशौष्ठव स्पर्धेत प्रथम क्र मांक लकी मिश्रा याने पटकावला

googlenewsNext

टिटवाळा  सीएम चषकांतर्गत कल्याण पश्चिम मतदारसंघातील टिटवाळा येथे रविवारी घेतलेल्या शरीरशौष्ठव स्पर्धेत प्रथम क्र मांक लकी मिश्रा याने पटकावला. तसेच २० पैकी टॉप १० शरीरसौष्ठवपटूंना गौरवण्यात आले.

युवकयुवतींना क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी भाजपाने राज्यभर सीएम चषक स्पर्धा घेतली. त्याचाच एक भाग म्हणून कल्याण पश्चिम मतदारसंघात या स्पर्धेत २० क्र ीडा आणि पाच सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आल्या. टिटवाळ्यात घेतलेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत जिल्ह्यातील २० खेळाडूंनी सहभाग घेतला. शेकडो प्रेक्षकांच्या उपस्थितीत ही स्पर्धा चांगलीच रंगली.

स्पर्धेत लकी मिश्रा याने बाजी मारली, तर हबीब सय्यद (द्वितीय), संतोष शुक्ला (तृतीय), शुभम वेताळ (चौथा), निखिल गोळे (पाचवा), प्रसाद शेट्टी (सहावा), गुंजा मुंजा (सातवा), संदेश पाटील (आठवा), मयूरेश मोरे (नववा), विक्र म चंदे (दहावा) या शरीरसौष्ठवपटूंना यावेळी मुख्यमंत्र्यांची सही असलेले प्रशस्तीपत्रक व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले.

कल्याण-डोंबिवलीच्या उपमहापौर उपेक्षा भोईर व भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव परेश गुजरे यांनी ही स्पर्धा भरवली होती. याप्रसंगी कल्याण पश्चिमचे आमदार नरेंद्र पवार, भाजपा नेते राजा पातकर, देवानंद भोईर, शक्तिवान भोईर, अमोल केदार, देवेंद्र सावंत, अनिल फड, विनायक भगत, मुन्ना रईस, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ठाणे जिल्हा बॉडी बिल्डर असोसिएशनने उत्तम नियोजन करून ही स्पर्धा यशस्वी केली.

Web Title: First Olympic medalist Lucky Mishra won the title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे