ग्रामस्वच्छतेत वाणगांव ग्रामपंचायतील प्रथम पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 10:54 PM2018-08-20T22:54:31+5:302018-08-20T22:54:45+5:30
मांडे व हमरापूर अनुक्रमे द्वितीय, तृतीय : स्वच्छता, पाणी, तंटामुक्ती अन् सलोख्याचे निकष
पालघर : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान २०१७-१८ अंतर्गत जिल्हास्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा व विशेष पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींना स्वातंत्र्य दिन समारंभात पालक मंत्री विष्णू सवरा यांचे हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी प्रथम क्र मांक ग्रामपंचायत वाणगाव, ता. डहाणू यांना ५ लाखाचे पारितोषिक, दिव्तीय ग्रामपंचायत मांडे ता. पालघर ३ लाख आणि तृतीय ग्रामपंचायत हमरापूर ता. वाडा यांना २ लाखाचे धनादेश, प्रशस्तीपत्रक देऊन पालक मंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच विशेष पुरस्कारांतर्गत कुटुंब कल्याण- स्व आबासाहेब खेडकर पुरस्कार विजेते ग्रामपंचायत खानिवडे ता. वसई यांना २५ हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. पिण्याचे पाणी व सांडपाणी व्यवस्थापन या करीता स्व. वसंतराव नाईक पुरस्कार विजयती ग्रामपंचायत शिरोषी ता. जव्हार यांना २५ हजाराचा धनादेश प्रदान करण्यात आला. तसेंच तलासरीतील झाई-बोरीगाव ग्रामपंचायतींना २५ हजार धनादेश प्रदान करून सामाजिक एकता डॉ. बाबसाहेब आंबेडकर पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी जि. प. अध्यक्ष विजय खरपडे, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, पोलीस अधीक्षक गौरव सिंग, उपाध्यक्ष निलेश गंधे, सभापती अशोक वडे आदि मान्यवर उपस्थित होते.